IPL 2021 Auction: ‘या’ 3 खेळाडूंची बेस प्राईज आहे सर्वात जास्त, फ्रँचायझी कदाचित लगावतील बोली
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या हंगामासाठी 18 फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीची मुदत गुरुवारी संपली असून, यात 814 भारतीय आणि 283 परदेशी खेळाडूंचा यात समावेश आहे. 207 आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू उपलब्ध असून, यात 21 भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. तसेच 863 बिगर आंतरराष्ट्रीय खेळाडूंची मोठी भर पडली असून, यात 743 भारतीय व 68 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंपैकी 11 खेळाडूंनी आपली बेस प्राईज दोन कोटी ठेवली आहे. आयपीएलच्या (IPL) शेवटच्या मोसमातील काही खेळाडूंची कामगिरी पाहता त्यांना यंदा मोठ्या बेस प्राईजवर फ्रँचायझी खरेदी करेल असे वाटत नाही. अशास्थितीत तीन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना यंदा कोणतीही फ्रँचायझी दोन कोटीच्या किंमतीवर खरेदी करू शकत नाही. (IPL 2021 Auction: टीम इंडियाच्या ‘या’ टेस्ट एक्स्पर्टवरही आयपीएल लिलावात लागणार दाव, मागील 6 हंगामात नाही मिळाला खरेदीदार)

हरभजन सिंह (Harbhajan Singh):

भारतीय संघाबाहेर असलेला अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंहने वैयक्तिक कारणास्तव गेल्या हंगामात आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. भज्जी सध्या 40 वर्षांचा असून अधिक सध्या आपले लक्ष युवा आणि तंदुरुस्त खेळाडूंकडे केंद्रित करीत आहेत. अशास्थितीत, कोणताही संघ कदाचित इतक्या पैशात विकत घेण्याचा प्रयत्न करेल.

केदार जाधव (Kedar Jadhav):

या यादीतील आणखी एका भारतीय म्हणजे केदार जाधव यांचे आहे, जो सध्या टीम इंडियामधून बाहेर असणाऱ्या अष्टपैलू खेळाडूपैकी एक आहे. जाधव मागील हंगाम संपूर्ण फ्लॉप ठरला आणि चेन्नई सुपर किंग्सने त्याला रिलीज केले. मागील मोसमात जाधवने 14 सामने खेळताना केवळ 162 धावा केल्या. त्यामुळे, कोणतीही टीम त्याला इतका पैसा देत विकत घेण्याची घेण्याची शक्यता कमीच आहे.

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell): 

मागील हंगामात एकही षटकार मारण्यात अपयशी ठरलेला मॅक्सवेल या यादीत तिसरा खेळाडू आहे ज्याची फ्लॉप ठरुनही बेस प्राईज सर्वात जास्त आहे. आयपीएलमध्ये एकेवेळी सर्वात महागडा खेळाडू ठरलेला मॅक्सवेलला युएईमध्ये खराब कामगिरीचा फटका बसला आणि किंग्स इलेव्हन पंजाबने बाहेरचा रास्ता दाखवला. मॅक्सवेलला केवळ 13.42 च्या सरासरीने 13 सामन्यांच्या 11 डावांत 108 धावाच करता आल्या. गोलंदाजीने देखील तो फारसे योगदान देऊ शकला नाही. त्याने 13 सामन्यांच्या सात डावांत फक्त तीन विकेट घेतल्या. मागील हंगामातील मॅक्सवेलची कामगिरी आणि त्याची विसंगती पाहता यंदा कदाचित फ्रँचायझी त्याच्यावर दाव लागावतील.