IPL 2021 Auction: टीम इंडियाच्या ‘या’ टेस्ट एक्स्पर्टवरही आयपीएल लिलावात लागणार दाव, मागील 6 हंगामात नाही मिळाला खरेदीदार

आयपीएलच्या फ्रँचायझींनी त्यांच्या संघानुसार आणि प्रोफाइलला सर्वोत्कृष्ट ठरवणाऱ्या खेळाडूंचा शोध सुरू केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेच्या नायक चेतेश्वर पुजारानेही लिलावासाठी स्वत:ची नोंदणी केली आहे. भारताचा स्टार कसोटी फलंदाज 50 लाखांच्या बेस प्राइसवर उपलब्ध असेल. पुजाराने अखेर 2014 मध्ये इंडियन प्रीमियर लीग खेळली होती.

IPL 2021 Auction: टीम इंडियाच्या ‘या’ टेस्ट एक्स्पर्टवरही आयपीएल लिलावात लागणार दाव, मागील 6 हंगामात नाही मिळाला खरेदीदार
चेतेश्वर पुजारा-हनुमा विहारी (Photo Credit: Twitter/BCCI)

IPL 2021 Auction: आयपीएल (IPL) फ्रँचायझींनी त्यांच्या संघानुसार आणि प्रोफाइलला सर्वोत्कृष्ट ठरवणाऱ्या खेळाडूंचा शोध सुरू केला आहे आणि अधिकाऱ्यांनी लिलावासाठी नोंदणी केलेल्या एकूण खेळाडूंची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेच्या नायक चेतेश्वर पुजारानेही (Cheteshwar Pujara) लिलावासाठी स्वत:ची नोंदणी केली आहे. भारताचा स्टार कसोटी फलंदाज 50 लाखांच्या बेस प्राइसवर उपलब्ध असेल. सॉलिड मिडल ऑर्डर फलंदाजाची शोधात असणारी कोणतीही टीम चेतेश्वरवर लक्ष ठेवून असेल. पुजाराने अखेर 2014 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) खेळली होती. पुजाराकडे आयपीएलमधील 30 सामन्यांचा अनुभव आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देण्यात पुजाराचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. मात्र, यंदा फ्रॅन्चायजी त्याच्यावर दाव लावते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. (IPL 2021 Auction: आयपीएल लिलावाच्या रिंगणात अर्जुन तेंडुलकरची उडी, जाणून घ्या त्याची बेस प्राईस व घरेलू रेकॉर्ड)

2014 मध्ये 33 वर्षीय पुजाराने अखेरचा आयपीएल सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन होता ज्यात त्याने 18 चेंडूत 19 धावा केल्या होत्या. यानंतर पुजाराला लिलावात कोणताही खरेदीदार मिळाला नाही आणि अनसोल्ड राहिला. मटार, यंदाच्या लिलावात त्याला संघात निवडले जाईल की नाही हे बर्‍याच घटकांवर अवलंबून असून मधल्या फळीतील पुजारा सनरायझर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यासाठी पर्याय सिद्ध होऊ शकतो. हैदराबाद, पंजाब आणि बेंगलोर संघाला सध्या मधल्या फळीसाठी फलंदाजाची गरज आहे. पुजारा 2010 आणि 2014 आयपीएल दरम्यान 3 फ्रँचायझीकडून खेळला आहे. मात्र, टी-20 लीगमध्ये तो आपली छाप पाडू शकला नाही. पुजारा 2010 मध्ये पहिले कोलकाता नाइट राइडर्सकडून खेळला तर त्यानंतर तो 2011-13 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा भाग होता. 2014 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला संधी दिली पण पुढच्याच वर्षी रिलीज केल्या ज्यानंतर पुजारामध्ये आयपीएलच्या कोणत्याही संघाने रस दाखवला नाही.

भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा सदस्य असलेल्या पुजाराने भारतासाठी केवळ 5 वनडे सामने खेळले आहे. त्याने 64 टी-20 सामने खेळले आहे. आयपीएलमध्ये त्याने 2010 ते 2014 दरम्यान 30 सामने खेळले असून 390 धावा केल्या. आयपीएलमधील पुजाराचा स्ट्राइक रेट 100 पेक्षा कमी आहे आणि त्याने एक अर्धशतक केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2021 01:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).