IPL 2021 Final Live Streaming, CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल फायनल सामन्याचे TV टेलिकास्ट व स्ट्रीमिंग लाईव्ह असे पहा
CSK विरुद्ध KKR, IPL 2021 फायनल लाईव्ह स्ट्रीमिंग (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा अंतिम सामना आज, 15 ऑक्टोबर चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात होणार आहे. हा सामना दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. विक्रमी नऊ वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या चेन्नईने तीन वेळा आयपीएलची चमकदार ट्रॉफी उंचावली आहे. केकेआर संघ सात वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम (IPL Final) फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वात केकेआरने (KKR) 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे केकेआरने सीएसकेचा (CSK) पराभव करून 2012 मध्ये पहिले विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे कोलकाता तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. त्यापूर्वी चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याच्या नाणेफेकीची वेळ, सामन्याची वेळ आणि लाईव्ह स्ट्रीमिंग आणि थेट प्रक्षेपणाबद्दल सर्व माहिती. (IPL 2021 Final, CSK vs KKR: चेन्नई विरुद्ध कोलकाता फायनल सामन्यात कोणता संघ मारणार बाजी? Wasim Jaffer ने अनोख्या शैलीत केली भविष्यवाणी)

धोनीचे सुपर किंग्ज आणि मॉर्गनच्या नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल 2021 चा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळला जाणार आहे. सीएसके विरुद्ध केकेआर जेतेपदाच्या सामन्यातील नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होईल. तसेच भारतीय प्रेक्षक आयपीएलच्या व्या मोसमाच्या फायनल सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार आणि थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. दरम्यान, सीएसकेने आतापर्यंत आयपीएल 2021 मध्ये उत्कृष्ट मोहिमेचा आनंद घेतला आहे. 14 सामन्यांत 9 विजयांसह त्यांनी साखळीचा टप्पा पूर्ण केला आणि आठ संघांच्या गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले. दुसरीकडे, केकेआरने यंदा वर्षाच्या सुरुवातीला कोविड-19 मुळे स्थगित झालेल्या आयपीएलनंतर स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात उल्लेखनीय बदल घडवला. संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत फायनलचे तिकीट मिळवले.

चेन्नई सुपर किंग्स संघ: रुतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, इमरान ताहिर, रॉबिन उथप्पा, चेतेश्वर पुजारा, कर्ण शर्मा, मोईन अली, जेसन बेहरनडोर्फ, कृष्णाप्पा गौथम, लुंगी एनगिडी, मिशेल सॅंटनर, रविश्रीनिवासन साई किशोर, हरी निशांत, एन जगदीसन, के. एम आसिफ, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा.

कोलकाता नाईट रायडर्स संघ: शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयन मॉर्गन (कॅप्टन), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), करुण नायर, पवन नेगी, कुलदीप यादव, गुरकीरत सिंह मान, शेल्डन जॅक्सन, संदीप वॉरियर, टीम सेफर्ट, रिंकू सिंह, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, वैभव अरोरा.