IPL 2021: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात ब्रिटिश खेळाडूंना मिळाला ग्रीन सिग्नल, टीम इंडियासोबत UAE साठी भरणार उड्डाण
जोस बटलर (Photo Credit: Twitter/@IPL)

IPL 2021 Phase-2: बीसीसीआयने (BCCI) इंग्लंडच्या खेळाडूंना इंडियन प्रीमियर लीग  (Indian Premier League) 2021 च्या उर्वरित भागात सहभागी होण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. इंग्लंडचे खेळाडू (England Cricketers) आता भारतीय खेळाडूंसह यूएईला (UAE) एकाच चार्टर्ड प्लेनने रवाना होणार आहेत आणि बबल-टू-बबल ट्रान्सफर करणार आहेत. 19 सप्टेंबरपासून युएई येथे आयपीएलचे (IPL) उर्वरित 31 सामने खेळले जाणार आहेत. इंग्लंड आणि बांग्लादेश दरम्यान व्हाईट बॉल मालिका पुढे ढकलली जाईल जेणेकरून ब्रिटिश खेळाडूंना आयपीएल 2021 साठी यूएईला जाण्यासाठी वेळ मिळेल असे समजले जात आहे. इंग्लिश संघ सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात 3 सामन्यांची वनडे आणि टी-20 मालिकेसाठी बांग्लादेश दौऱ्यावर जाणार होती तथापि, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आता पुढील वर्षाच्या सुरुवातीला व्हाईट-बॉल मालिका पुन्हा ठरवण्याच्या विचारात आहे. (IPL 2021: आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात झळकणार ‘या’ देशाचे खेळाडू; SRH, मुंबई इंडियन्स संघाला होणार फायदा)

एएनआयशी बोलताना, घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआयला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून खेळाडूंच्या सहभागाबद्दल ग्रीन सिग्नल मिळाला आहे आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी इंग्लंड व बांग्लादेश बोर्डाशी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाचे उत्तम उदाहरण आहे. “यूएईमध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात इंग्लिश खेळाडू उपलब्ध होतील. बीसीसीआयला हिरवा सिग्नल मिळाला आहे. हे सचिवाचे केवळ ईसीबीच नव्हे तर बीसीबीसोबतचे उत्कृष्ट कार्य संबंध दर्शवते,”असे सूत्राने सांगितले. दरम्यान, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी म्हणाले की, टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर इंग्लंडविरुद्ध मालिका पुन्हा आयोजित करण्याचा बोर्ड प्रयत्न करत आहे.

ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी बांग्लादेश दैनिक दैनिकाला सांगितले की, “दोन्ही संघ [बांग्लादेश आणि इंग्लंड] टी-20 विश्वचषकापूर्वी बरेच क्रिकेट खेळत आहेत, म्हणून आम्ही ईसीबीशी चर्चा करत आहोत की स्पर्धेनंतर मालिका आयोजित केली जाऊ शकते का?” गेल्या महिन्यात बीसीसीआयने यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल 2021 च्या उर्वरित वेळापत्रकाची घोषणा केली. 27 दिवसांच्या कालावधीत एकूण 31 सामने खेळले जातील. उल्लेखनीय म्हणजे, इंग्लंड 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी 2 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार आहे.