केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

IPL 2021 Phase-2: आयपीएल (IPL) 2021 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी सत्रात खेळण्यासाठी अनेक देशांतील खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली आहेत. कोरोनामुळे आणि राष्ट्रीय संघांचे वेळापत्रकमुळे अनेक खेळाडूंना आयपीएलच्या आगामी सत्रात भागात खेळणे कठीण दिसत आहे. यादरम्यान एक दिलासादायक बातमी समोर येत आहे की न्यूझीलंडचे खेळाडू (New Zealand Cricketers) आयपीएलच्या या भागात देखील खेळताना दिसतील. याचा सर्वाधिक फायदा सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला होणार आहे. न्यूझीलंडच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या किवी खेळाडूंबद्दल अनेक कयास बांधले जात होते. (IPL 2021: युएईमध्ये आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची BCCI ने केली घोषणा, जाणून घ्या नवीन वेळापत्रक)

“न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson), वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult), लोकी फर्ग्युसन आणि अष्टपैलू जेम्स नीशम आयपीएलच्या उत्तरार्धात खेळताना दिसतील,” जिओटीव्हीने न्यूझीलंड क्रिकेट प्रमुख डेव्हिड व्हाईटच्या हवाल्याने सांगितले. हे सर्व खेळाडू पाकिस्तानविरुद्ध मालिकेत खेळणार नाही. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात किवी संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. दोन्ही देशांदरम्यान तीन एकदिवसीय आणि फक्त तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत. कीवी खेळाडूंनी आयपीएलच्या माध्यमातून आगामी टी-20 विश्वचषकची तयारी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. केन विल्यमसन हैदराबाद संघाचा कर्णधार आहे तर बोल्ट पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सचा मुख्य विदेशी गोलंदाज आहे. आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबरपासून खेळले जातील.

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात परदेशी खेळाडूंची उपलब्धता ही बीसीसीआयसाठी अत्यंत चिंतेची बाब बनली आहे. आयपीएलमध्ये न्यूझीलंडचे अनेक खेळाडू खेळतात. विल्यमसन सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आहे. त्याचबरोबर अ‍ॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट आणि जिमी नीशमसारखे खेळाडू मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग आहेत. मिचेल सॅन्टनर चेन्नई सुपर किंग्जच्या संघात आहे आणि लोकी फर्ग्युसन व टीम सेफर्ट हे केकेआर संघात आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने फिन अ‍ॅलन आणि काईल जेमीसन यांना त्यांच्या संघात स्थान दिले आहे.