IPL 2021: कराराचं उल्लंघन केल्याबद्दल RCB ने Dan Christian याला दिली चेतावणी, जाणून घ्या पूर्ण प्रकरण
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

IPL 2021: ऑस्ट्रेलियन अष्टपैलू डॅनियल ख्रिश्चनला (Daniel Christian) आयपीएल (IPL) फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (Royal Challengers Bangalore) नुकतंच The Grade Cricketer’s ला दिलेल्या एका मुलाखतीनंतर ‘कराराचा भंग’ केल्याचा आरोप करत फटकार लावली आहे. काईल जेमिसनने (Kyle Jamieson) नेटमध्ये आरसीबी (RCB) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) गोलंदाजी करण्यास नकार दिला, असं ख्रिश्चनने मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. ग्रेड क्रिकेटर या युट्यूब चॅनलवर ख्रिश्चनने मुलाखत दिली, पण ऑस्ट्रेलियन अष्टपैलूने कराराचं उल्लंघन केल्याचं सांगत त्यांना युट्युबवरून हा व्हिडिओ डिलीट करावा लागला आहे. या कार्यक्रमात ख्रिश्चनने कर्णधार विराटबद्दल काही वक्तव्यं देखील केली. मैदानाबाहेरच्या टीम बैठकांमध्ये विराट फक्त अर्धावेळच असतो, असं ख्रिश्चनने मुलाखतीत सांगितलं. त्यानंतर ख्रिश्चनने केलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. आणि हे प्रिंट मीडियात आणि ऑनलाईन देखील प्रसारित केले गेले होते. (IPL 2021: आयपीएल सीजन 14 च्या मध्यात Mumbai Indians ची साथ सोडून ‘हा’ धाडक खेळाडू विराटच्या RCB ताफ्यात झाला सामील)

ख्रिश्चनसह न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसन देखील ‘द ग्रेड क्रिकेटर’ला दिलेल्या मुलाखतीत उपस्थतीत होता. ख्रिश्चनने केलेल्या अनेक खुलासांपैकी एक म्हणजे विराट कोहलीने आगामी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची तयारी करण्यासाठी Duke बॉलने जेमीसनला गोलंदाजी करण्यास सांगितले होते. मुलाखतीनंतर ख्रिस्चनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कराराच्या उल्लंघन करण्याबाबत चेतावणी दिली असल्याचं समोर येत आहे. ख्रिस्चनच्या मुलाखतीचा हा व्हिडिओ द ग्रेड क्रिकेटरच्या ‘यूट्यूब चॅनल’ ने दिलीत केला आहे. कार्यक्रमाचे निवेदक सॅम पेरी यांनी सांगितले की ख्रिश्चनने त्यांना व्हिडिओ काढण्याची विनंती वैयक्तिकपणे केली होती. दरम्यान, शोमध्ये हजर राहण्यासाठी काईल जेमीसनलाही चेतावणी मिळाली की नाही हे अद्याप समजले नाही आहे.

सॅम पेरी पुढे म्हणाले की मुलाखतीचा व्हिडिओ का काढून घेण्यात आला याबद्दल फक्त अटकळ लावता येईल आणि अधिकृतरित्या या व्हिडिओचे कायदेशीर अधिकार आरसीबीकडे होते. तसंच पेरीने अखेरीस महिणतले की मुलाखतीच्या व्हिडिओवर आता बंदी घालण्यात आली आहे आणि आरसीबीला आता हा व्हिडिओ कोणालाही दाखवण्याची इच्छा नाही.