CSK vs DC IPL 2021: चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या आवृत्तीत शनिवार, 11 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) मोठा पराभव पत्करावा लागला आणि यानंतर धोनीला खेळादरम्यान ओव्हर-रेट कमी ठेवण्यासाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. “10 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विवो इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) संघाने ओव्हर-रेट कायम राखल्यानंतर दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या (IPL) आचारसंहितेच्या अंतर्गत कमीत-कमी अत्यधिक-रेट गुन्ह्याशी संबंधित त्याच्या संघाचा हंगामातील हा पहिला गुन्हा होता म्हणून धोनीला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला,” आयपीएलने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. (CSK vs DC IPL 2021 Match 2: शिखर धवनचे धमाकेदार अर्धशतकाने दिल्लीची झोक्यात सुरुवात, चेन्नईवर 7 विकेट्सने केली मात)
विशेष म्हणजे सीएसकेचा हा हंगामातील पहिला गुन्हा होता आणि त्यामुळे या माजी कर्णधारला केवळ दंड ठोठावण्यात आला होता पण आणखी काही चूक झाल्यास त्याच्या एक किंवा दोन सामन्यांसाठी निलंबित केले जाऊ शकते. आयपीएलच्या नव्या कडक नियमांनुसार प्रत्येक संघाला 90 मिनिटांत डाव पूर्ण करावा लागतो. यामध्ये अडीच मिनिटांचे प्रत्येकी दोन स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा देखील समावेश आहे. नियमानुसार, ओव्हर रेट प्रति तासाला 14.1 ओव्हरचा आहे. “सामन्यांच्या वेळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक डावातील 20वी ओव्हर आता 90 मिनिटांत समाविष्ट केले जाते, त्यापूर्वी 20वी ओव्हर 90व्या मिनिटाला किंवा त्यापूर्वी सुरू होणार होते. आयपीएल सामन्यांमध्ये किमान ओव्हर रेट प्रति तास 14.11 ओव्हर (टाईम आउटमुळे घेण्यात येणाऱ्या वेळेकडे दुर्लक्ष केल्यास) ओव्हरचा असावा,” बीसीसीआय अधिकाऱ्याने यापूर्वी सांगितले होते.
या सामन्याबद्दल बोलताना धोनी शून्यावर बाद झाला, परंतु संघाने सुरेश रैनाच्या अर्धशतक आणि सॅम कुरनच्या फटकेबाजीच्या जोरावर 188 धावांपर्यंत मजल मारली. परंतु, पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या शानदार शोमुळे दिल्ली कॅपिटल्सने फक्त 18.4 ओव्हरमध्ये सात विकेट्स राखून संघाला विजयीरेष पार करून दिली. पृथ्वी आणि धवनने पहिल्या विकेटसाठी 13.3 ओव्हरमध्ये 138 धावांची भागीदारी केली.