भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. धोनीची पत्नी साक्षी धोनीने (Sakshi Dhoni) ही माहिती दिली आहे. हा पाहुणा दुसरा, तिसरा कोण नसून एक घोडा आहे. कुटुंबियांनी त्याचे नाव चेतक (Chetak) ठेवले आहे. महेंद्र सिंह धोनीला प्राण्यांची खूप आवड आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. धोनीच्या घरी सध्या 4 पाळीव कुत्रे आहेत. सॅम, लिली, गब्बर आणि झोया, अशी त्यांची नावे आहेत. धोनी हा भारतीय क्रिकेट संघातील दुसरा खेळाडू आहे, ज्याच्याकडे घोडा आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा याच्याकडेही चार घोडे आहेत.
साक्षी धोनीने इन्स्टाग्राम केलेल्या पोस्टला असे कॅप्शन दिले आहे की, चेतक आपले स्वागत आहे. जेव्हा आपण लिलीला भेटलात तेव्हा आपण सज्जन माणसासारखे वागले. आपणास आमच्या कुटुंबाने आनंदाने स्वीकारले आहे. हे देखील वाचा- ICC World Test Championship च्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड दौऱ्यातील Test series साठी टीम इंडियाची घोषणा
इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीचे रांचीमध्ये एक फार्महाऊस असून तो येथे शेतीही करतो. धोनीने ऑर्गेनिक पद्धतीने केलेल्या शेतीची जगभरात चर्चा झाली होती. येथे उत्पादन घेतलेला भाजीपाला देशासह परदेशातही निर्यात केला जातो.