IPL 2021 मध्ये CSK च्या या गोलंदाजाची झाली सर्वाधिक धुलाई, रन लुटवणारा ठरला नंबर-1 गोलंदाज, यादीत भारतीयांचा दबदबा
चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Instagram)

Bowler Conceded Most Runs in IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 2021 हंगाम पुढे ढकलण्यापूर्वी या लीगमध्ये खेळल्या गेलेल्या 29 सामन्यात गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यंदाच्या आयपीएलमध्ये  आतापर्यंतच्या सामन्यात सर्वाधिक धावा लुटवणारा नंबर 1 गोलंदाज ठरला आहे. शार्दुल ठाकूरने सीएसकेसाठी (CSK) आपल्या संभाव्यतेनुसार कामगिरी केली नाही आणि त्याच्या गोलंदाजीवर विरोधी फलंदाजांनी जोरदार धावा काढल्या. आयपीएलच्या (IPL) बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे 29 सामन्यानंतर स्पर्धा मध्यावरच स्थगित करण्यात आली. आयपीएलचा यंदाचा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगि होईपर्यंत चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आघाडी घेतली होती. (MS Dhoni ची उदारता, CSK ‘कॅप्टन कूल’ने केले असे काम ज्याचा विराट-रोहितनेही नाही केला विचार; जाणून म्हणाल क्या बात है!)

शार्दुलने सीएसकेसाठी एकूण 7 सामने खेळले, परंतु त्यात तो प्रभाव पाडू शकला नाही. एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने खेळलेल्या 7 सामन्यांमध्ये संघाने 5 सामने जिंकले आणि 2 गमावले. सीएसकेसाठी संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने 7 सामन्यात 10.33 च्या इकॉनॉमी रेटने 267 धावा लुटवल्या. त्याने 7 सामन्यांत एकूण 5 विकेट्स घेतल्या आणि यादरम्यान 53/2 अशीत्याची सर्वोत्तम गोलंदाजीची नोंद केली. त्यामुळे, लीगच्या स्थगितीपर्यंत शार्दुल ठाकूर सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला. शिवाय, या यादीत टॉप-5 गोलंदाजांच्या यादीत भारतीय खेळाडूंचे वर्चस्व दिसत आहे. लीगमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा देण्याच्या बाबतीत हर्षल पटेल दुसर्‍या क्रमांकावर आहे ज्याने एकूण 257 धावा दिल्या तर प्रसिद्ध कृष्णाने 243 धावा देत तिसरे स्थान पटकावले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचा महागडा विदेशी गोलंदाज पॅट कमिंगनेही यंदाच्या मोसमात 237 धावा लुटत सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजनच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. तसेच, पाचव्या स्थानावर भारताच्या मोहम्मद शमीने ताबा मिळवला आहे. शमीने एकूण 234 धावा दिल्या. लक्षात घेण्यासारखे म्हणजे हर्षल पटेल या यादीत एकमेव अनकॅप्ड गोलंदाज असून अन्य चार आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले गोलंदाज आहेत.