MS Dhoni ची उदारता, CSK ‘कॅप्टन कूल’ने केले असे काम ज्याचा विराट-रोहितनेही नाही केला विचार; जाणून म्हणाल क्या बात है!
एमएस धोनी आणि लुंगी एनगीडी (Photo Credit: PTI)

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनीची (MS Dhoni) गणना जगातील महान कर्णधारांमध्ये केली जाते आणि आयपीएल (IPL) 2021 च्या स्थगितीनंतर त्याने पुन्हा एकदा ते निस्वार्थ कृतीने सिद्ध केले. एमएस धोनीने असे काही केले आहे ज्याची विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनीही कल्पनाही केली नाही. धोनी सोबत विराट-रोहितही आयपीएलमध्ये लोकप्रिय संघांची कमान सांभाळत आहेत. धोनीने आपल्या चेन्नई सुपर किंग्जच्या सहकाऱ्यांना सांगितले आहे की, फ्लाइटमधून घरी परतणारा तो संघातील शेवटचा व्यक्ती असेल. धोनी म्हणाला की, तो पहिले परदेशी आणि नंतर इतर भारतीय खेळाडूंच्या रवाना होण्याची प्रतीक्षा करेल व नंतरच दिल्लीहून रांचीला परत जाईल. धोनीचा असा निःस्वार्थ स्वभाव त्याला खास बनवते. (IPL 2021 Suspended: आयपीएल 14 स्थगित केल्याने ‘या’ 3 संघांना झाला सर्वाधिक फायदा, घेतला असेल सुटकेचा नि:श्वास)

‘द इंडियन एक्स्प्रेस’ च्या वृत्तानुसार, धोनीने रांचीला रवाना होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघातीलभारतीय तुकडीतील तसेच परदेशी खेळाडूंना मायदेशी पाठवण्यात प्राधान्य दिले. “माहिभाई म्हणाले की हॉटेल सोडणारी ही शेवटची व्यक्ती असेल. प्रथम परदेशी आणि नंतर भारतीय खेळाडूंनी जावे अशी त्याची इच्छा होती,” सीएसके सदस्याने सांगितले. आयपीएल 2021 मधील उर्वरित सामने स्थगित करण्याच्या निर्णयाच्या नंतर परदेशी खेळाडूंची सुरक्षित घर वापसी बीसीसीआयचे सर्वात मोठे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियांना वगळता बहुतेक परदेशी खेळाडू आधीच घरी पोहोचले असून बुधवारी सीएसकेचे भारतीय युनिट घरी परत जाईल. सीएसकेने दिल्ली ते राजकोट, मुंबई, बेंगलोर आणि चेन्नई येथे आपल्या खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानांचे आयोजन असल्याचं वृत्त पत्रात म्हटले आहे. विदेशी खेळाडूंना प्राधान्य देत धोनी मागे राहिला व तो आता गुरुवारी रांचीसाठी रवाना होईल.

दरम्यान, बीसीसीआयने सर्व भारतीय खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांच्या सदस्यांना माहिती दिली आहे की त्यांनी तीन दिवस स्वतःला क्वारंटाईन ठेवावे आणि आगमनाच्या तिसर्‍या दिवशी आरटी-पीसीआर टेस्टची व्यवस्था केली जाईल. कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण भारतभर कहर केला आहे आणि अशा संकटकाळी क्रिकेटपटू एकमेकांची काळजी घेत असल्याचे पाहून खूप आनंद होतो.