भारतात वाढणाऱ्या कोरोनाचा (Coronavirus) देशातील लोकप्रिय लीग आयपीएलवर (IPL 2021) मोठा परिणाम होताना दिसत आहे. दरम्यान, आस्ट्रेलिया आणि राजस्थान रॉयल्सचा वेगवाग गोलंदाज एंड्रयू टॉयने (Andrew Tye) आयपीएलमधून माघार घेऊन रविवारी त्याच्या मायदेशात परत गेला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ऑस्ट्रेलिया सरकार भारतातून येणाऱ्या विमानावर बंदी घालण्याची त्याला भिती होती. यामुळे त्याने त्याच्या मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. तसेच संपूर्ण देश कोरोनाविरोधात लढा देत असताना फ्रँचायझींकडून आयपीएलवर इतका पैसा का खर्च केला जात आहे? असाही प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.
भारतात दररोज सुमारे तीन लाख नव्या कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे ब्रिटन आणि न्यूझीलंडसह अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून भारतातून येणाऱ्या लोकांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. तर, ऑस्ट्रेलियाने 30 टक्के उड्डाणे कमी केली आहेत. यामुळे टॉयने आयपीएलमधून बाहेर पडला आहे. यावर तो म्हणाला की, भारतातून त्याचे होमटाऊन पर्थ येथे परतणाऱ्या लोक मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित आढळून येत आहेत. यामुळे भारतातून येणाऱ्या लोकांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता ऑस्टेलिया सरकार भारतातून येणारी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात, यामुळे त्याने आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हे देखील वाचा-CSK Vs RCB: आरसीबीविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी रविंद्र जाडेजा महेंद्रसिंह धोनीच्या आधी का आला? महत्वाची माहिती आली समोर
ट्विट-
JUST IN: Andrew Tye has left India as the country's #COVID19 catastrophe worsens #IPL2021
— cricket.com.au (@cricketcomau) April 26, 2021
टॉयनंतर ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे अॅडम झांपा आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा मागील हंगाम यूएईमध्ये पार पडला होता. तर, यंदाचा हंगाम प्रेक्षकांविना भारतात खेळवला जात आहे.