CSK Vs RCB: आरसीबीविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी रविंद्र जाडेजा महेंद्रसिंह धोनीच्या आधी का आला? महत्वाची माहिती आली समोर
Ravindra Jadeja (Photo Credit: IPL)

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील 20व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (CSK Vs RCB) दारूण पराभव केला आहे. एकतर्फी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईच्या संघाने बेंगलोरसमोर 192 धावांचे लक्ष्य दिले होते. परंतु, चेन्नईच्या भेदक गोलंदाजीसमोर बेंगलोरच्या संघाला केवळ 122 धावापर्यंत मजल मारता आली आहे. ज्यामुळे चेन्नईने 69 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईच्या या विजयात रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) अष्टपैलू कामगिरीचा मोलाचा वाटा होता. त्याच्या या कामगिरीचे चेन्नईच्या संघासह बऱ्याच खेळाडूंनी कौतूक केले आहे.

आरसीबीविरुद्ध सामन्यात रविंद्र जाडेजा पाचव्या क्रमांकावर आला होता. दरम्यान, त्याने केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर चेन्नईला आव्हानात्मक धावसंख्या उभारणे शक्य झाले. आता सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने जडेजाला फलंदाजीत बढती देण्यामागील कारणाचा खुलासा केला आहे. हे देखील वाचा- Commonwealth Games 2021: कॉमन वेल्थ गेम्स खेळण्यासाठी पहिल्यांदाच महिला क्रिकेट संघ उतरणार मैदानात; 'हे' 6 देश ठरले पात्र

महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, "जाडेजाकडे एकट्याच्या बळावर सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता आहे. त्याच्या फलंदाजीत मागील काहीत वर्षात चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी काढून घेण्यासाठी त्याला अधिक वेळ आणि अधिक चेंडू देणेच योग्य आहे. म्हणूनच त्याला आम्ही फलंदाजी क्रमात बढती दिली आहे", असे धोनी म्हणाला आहे.

आरसीबीविरुद्ध सामन्यात जाडेजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याने या सामन्यात 28 चेंडूत 62 धाव ठोकल्या. एवढेच नव्हेतर, गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या जाडेजाने 3 विकेट्स देखील पटकावले आहेत.