IPL 2021 Auction: मोहम्मद अझरुद्दीनसाठी आयपीएल लिलावात 5 फ्रँचायझी लगावू शकतात बोली, होऊ शकते रंगतदार स्पर्धा
IPL Trophy (Photo Credits: IANS)

IPL 2021 Auction: 2021 सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी (Syeed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेत मुंबईविरुद्ध (Mumbai) केलेल्या शानदार कामगिरीनंतर केरळचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन (Mohammed Azharuddin) चर्चेचा विषय ठरला आहे. सुरेश रैना, हर्षा भोगले, वीरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या दिग्गजांनी देखील वानखेडे स्टेडियमवर केरळच्या (Kerala) खेळाडूची कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले. आयपीएल (IPL) फ्रँचायझी देखील या स्पर्धेवर बारकाईने अनुसरण करत असतील आणि त्याचे शतक पाहिल्यानंतर अनेक संघांचा केरळच्या या फलंदाजाने रस निर्माण केला असेल.  आयपीएल 2021 साठी (IPL Auction) खेळाडूंचा लिलाव फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. भारतीय बॉर्डरने फ्रँचायझींना रिटेन आणि रिलीज करणाऱ्या खेळाडूंची यादी निश्चित करण्यासाठी 20 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. या प्रक्रियेनंतर लिलावाची प्रक्रिया सुरु होईल. यंदा मिनी लिलाव असल्याने 2021 च्या लिलावात अझरुद्दीन आपला आयपीएल कराराची शक्यता आहे. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: मोहम्मद अझहरुद्दीनचे तुफानी टी-20 शतक, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 37 चेंडूत सेन्चुरी ठोकणारा कोण आहे केरळ फलंदाज, जाणून घ्या)

अझरुद्दीन एक सलामी फलंदाज असून आयपीएलमधील 5 फ्रँचायझी त्याच्यासाठी बोली लगावू शकतात. ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

1. चेन्नई सुपर किंग्स

शेन वॉटसनच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीनंतर चेन्नई सुपर किंग्जला सलामीच्या फलंदाजाची आवश्यकता आहे. वॉटसनच्या अनुपस्थितीमुळे चेन्नईस्थित फ्रेंचायझीमध्ये मोठी जागा रिकामी झाली आहे तथापि, सुपर किंग्जसाठी मोहम्मद अझरुद्दीन ही समस्या सोडवू शकला. रुतूराज गायकवाड सुपर किंग्जकडून डावाची सलामीला येण्याची शक्यता आहे आणि मोहम्मद त्याचा नवीन सलामीचा जोडीदार बनू शकतो. तसेच अझरुद्दीन हा विकेटकीपर-फलंदाज आहे. त्यामुळे, धोनी विश्रांती घेण्यास प्राधान्य देत असेल किंवा कोणत्याही कारणास्तव अनुपलब्ध असेल तर चेन्नई त्याला कीपर म्हणून वापरु शकेल.

2. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

परिपूर्ण सलामी संयोजन करण्यासाठी बेंगलोरला सलामीवीरची आवश्यकता आहे. देवदत्त पडिक्क्लने आयपीएल 2020 मध्ये पदार्पण केले होते, परंतु त्याचा साथीदार तितकासा सुसंगत नव्हता. आरसीबीने मागील वर्षी आरोन फिंच, जोश फिलिप आणि विराट कोहलीचा सलामी फलंदाज म्हणून वापर केला होता. त्यामुळे आरसीबीने केरळच्या सलामीवीरासाठी बोली लगावू शकतो जो पडिक्क्लसह सलामीला येईल.

3. राजस्थान रॉयल्स

आयपीएल 2021 च्या लिलावापूर्वी रॉयल्स स्टीव्ह स्मिथला त्यांच्या संघातून मुक्त करण्याचा विचार करत आहे. स्मिथनंतर त्यांना अव्वल फळीतील फलंदाजाची आवश्यकता असेल आणिअझरुद्दीन त्या भूमिकेसाठी योग्य पर्याय असू शकतो. अझरुद्दीन रॉबिन उथप्पा किंवा यशस्वी जयस्वालसह सलामीला येऊ शकतो.

4. सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादने गेल्या वर्षी परदेशी खेळाडू म्हणून जॉनी बेअरस्टोपेक्षा केन विल्यमसनला पसंती दिली. डेविड वॉर्नरचा सलामी जोडीदार म्हणून रिद्धिमान साहाने कौतुकास्पद काम केले. तथापि, साहा जखमी झाल्यानंतर श्रीवत्स गोस्वामीला साहाच्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.म्हणून, लिलावात अझरुद्दीनला खरेदी करण्यावर हैदराबादचे लक्ष लागून असेल, शिवाय, साहा अनुपलब्ध असल्यास तो त्यांच्यासाठी बॅक-अप विकेटकीपिंगचा उत्तम पर्याय ठरू शकतो.

5. दिल्ली कॅपिटल्स

दिल्लीला बॅक अप विकेटकीपरची आवश्यकता आहे कारण रिषभ पंतच्या अनुपस्थितीत अ‍ॅलेक्स कॅरीला उत्तम कामगिरी करता आली नाही. जर दिल्लीकडे भारतीय बॅक-अप विकेटकीपिंग पर्याय असेल तर पंत अनुपलब्ध असल्यास तो त्यांना परदेशी लाइनअपशी खेळण्याची संधी देणार नाही. म्हणून, लिलावात दिल्ली मोहम्मद अझरुद्दीनला खरेदी करण्यावर भर देऊ शकते.