चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Instagram)

IPL 2021 Remaining Matches: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021  सप्टेंबर महिन्यात पुन्हा सुरु होण्यामुळे न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) खेळाडूंवर अवलंबून असलेल्या काही फ्रँचायझींवर परिणाम होऊ शकेल कारण ते या विंडो दरम्यान अनुपलब्ध असतील. आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेमुळे आयपीएलला (IPL) पुन्हा प्राधान्य देण्यास बोर्ड टाळाटाळ करत आहेत. टी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबर महिन्यात होणार असल्यामुळे परदेशी खेळाडूंना पुरेसे खेळ मिळणे फार महत्वाचे आहे आणि बोर्ड त्यांच्या खेळाडूंना जास्त कामाच्या ताणतणावातून मुक्त ठेवण्याचा विचार करू शकतात. अशास्थितीत या दोन्ही देशातील खेळाडूंवर अवलंबून असणाऱ्या या तीन प्रमुख फ्रँचायझींचे मोठे नुकसान होईलच शिवाय, त्यांना प्लेऑफ स्थान मिळवणे कठीण होईल. (IPL 2021 आणि CPL टूर्नामेंटच्या तारखांमध्ये टक्कर, कॅरेबियन लीग लवकर सुरु करण्यासंदर्भात BCCI व WI बोर्डात चर्चा)

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

आयपीएल पुन्हा सुरू झाल्यावर इंग्लंडचे खेळाडू उपलब्ध नसल्यास आणि संघातील बहुतेक खेळाडूंसोबत प्लेइंग इलेव्हन तयार केलया राजस्थान रॉयल्स सर्वाधिक प्रभावित संघ ठरेल. जोफ्रा आर्चर, जोस बटलर आणि बेन स्टोक्स हे त्यांचे आघाडीचे खेळाडू आहेत आणि बोर्ड जर खेळाडूंना परवानगी देत नसतील तर रॉयल्ससाठी हा मोठा धक्का सिद्ध होईल. यंदाच्या हंगामात त्यांनी सातपैकी तीन सामने जिंकले आणि त्यांचे प्लेऑफ स्थान मुख्यत: परदेशी खेळाडूंवर अवलंबून होते. इंग्लिश खेळाडू युएईमध्ये आयपीएलसाठी उपलब्ध असावे अशी त्यांची अपेक्षा असेल मात्र ते संभव होताना दिसत नाही.

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)

मध्यावर आयपीएल निलंबित झाले तेव्हा हैदराबाद गुणतालिकेच्या तळाशी होते आणि त्यांचे परदेशी जॉनी बेयरस्टो आणि केन विल्यमसन आगामी दुसऱ्या टप्प्यासाठी उपलब्ध नसणे ही त्यांच्यासाठी सर्वात वाईट बातमी असू शकते. ते बेयरस्टोवर यंदाच्या हंगामात अवलंबून आहेत. त्याने 7 सामन्यांत संघासाठी सर्वाधिक 248 धावा केल्या होत्या. डेविड वॉर्नरची हकालपट्टी केल्यानंतर विल्यमसनची फ्रँचायझीचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि आता हा वाईट निर्णय ठरू शकतो कारण न्यूझीलंडचे खेळाडू आयपीएल 2021 मधूनही बाहेर पडू शकतात. विल्यमसन आणि बेअरस्टो हे सनरायझर्सचे दोन महत्त्वाचे फलंदाज आहेत आणि त्यांच्याशिवाय प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे हैदराबादसाठी खरोखर कठीण ठरेल.

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)

चेन्नई सुपर किंग्जने 7 सामन्यांत 5 विजयांसह स्पर्धेच्या मध्यभागी दुसरे स्थान मिळवले आणि त्यामागील मुख्य कारण म्हणजे परदेशी तुकडी अतिशय मजबूत होती. सीएसकेला इंग्लंड आणि न्यूझीलंडचे मोईन अली, सॅम कुरन आणि मिचेल सॅटनर हे खेळाडू मिळाले आहेत आणि आयपीएल पुन्हा सुरू झाल्यावर कदाचित ते स्पर्धेतून बाहेर पडू शकतात. तिसर्‍या क्रमांकावर सीएसकेच्या फ्रँचायझीसाठी मोईनने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याने संघात अष्टपैलू म्हणून काम केले. सॅम कुरनला चेन्नईने ड्वेन ब्रावोच्या पुढे संधी दिली आणि त्याने बॅट व चेंडूने काही प्रभावी कामगिरी करून निर्णय योग्य ठरवलं. त्यामुळे, सीएसकेची गाडी कदाचित प्लेऑफच्या रुळावरून खाली पडू शकते, जर हे दोन खेळाडू संघाने गमावले आणि त्यांना इतर पर्यायांचा विचार करण्याची गरज असेल.