चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) वेगवान गोलंदाज दीपक चहरची (Deepak Chahar) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्याने बीसीसीआयकडून इंडियन प्रीमिअर लीग 2020 स्पर्धेच्या वेळापत्रकाला स्थगिती देण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे अनेक दीपक चहरच्या संपर्कात आल्याने सपूर्ण टीमला क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने आयपीएलचे वेळापत्रक होल्डवर ठेवले आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाचे आयपीएल संयुक्त अरब अमिरातीय येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 19 तारखेला आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगणार आहे.
आयपीएल 2020 च्या स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी केवळ 20 दिवस शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत सर्वकाही सुरळीत सुरु होते. यासाछठी फ्रेंचाइजीने प्री-आयपीएल कॅम्प सुरु करण्यात आला आहे. आयपीएल कॅम्प अगोदर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 7 फ्रेंचाइजी या चाचणीत पास झाले असून चेन्नईच्या संघाला मोठा झटका बसला आहे. यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे. तसेच या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाय केले जात असल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- IPL 2020: सुरेश रैना UAE वरुन भारतात परतला; वैयक्तिक कारणामुळे यंदाच्या आयपीएल सीजनला मुकणार
महत्वाचे म्हणजे, बीसीसीआय किंवा चेन्नई सुपर किंग्जने याबाबत अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही. दीपक चहरला आता 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा त्याची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, 24 तासाच्या आत त्याचे 2 अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला मैदानावर उतरण्याची संधी देण्यात येणार येईल, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने सुत्राच्या हवाल्याने दिली आहे.