IPL 2020: सुरेश रैना UAE वरुन भारतात परतला; वैयक्तिक कारणामुळे यंदाच्या आयपीएल सीजनला मुकणार

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा खेळाडू सुरेश रैना हा वैयक्तिक कारणास्तव IPL सोडून दुबईहून भारतात परतला आहे. त्यामुळे आयपीएल 2020 च्या उर्वरित सीजनमध्ये तो खेळू शकणार नाही. अशी माहिती चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे

IPL 2020: सुरेश रैना UAE वरुन भारतात परतला; वैयक्तिक कारणामुळे यंदाच्या आयपीएल सीजनला मुकणार
Suresh Raina (Photo Credits: IANS)

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाचा खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) हा वैयक्तिक कारणास्तव IPL सोडून दुबईहून (UAE) भारतात परतला आहे. त्यामुळे आयपीएल 2020 (IPL 2020) सीजनमध्ये तो खेळू शकणार नाही. अशी माहिती चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी के एस विश्वनाथन (CEO KS Viswanathan) यांनी चेन्नई सुपर किंग्जतर्फे सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबाला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

अलिकडेच सुरेश रैना याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. 15 ऑगस्ट रोजी धोनी पाठोपाठ त्याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. त्यानंतर क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गरजूंना संधी मिळण्यासाठी सुरेश रैना याने जम्मू काश्मीर येथे क्रिकेटचे प्रमोशन केले. (MS Dhoni and Suresh Raina Retirement: ‘या’ कारणामुळे एमएस धोनी-सुरेश रैना यांनी 15 ऑगस्टला घेतली निवृत्ती, रैनानं स्वतः केला खुलासा)

Chennai Super Kings Tweet:

सुरेश रैना हा 2008 पासून आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. अजून पर्यंत त्याने 193 सामन्यात 5368 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि 38 अर्धशतकं यांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने 25 विकेट्स सुद्धा घेतल्या आहेत. सुरैश रैना याने चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाचा चौथ्यांचा आयपीएल जिंकण्यास मानस आहे. परंतु, रैनाच्या गैरहजेरीत संघाला अधिक जिंकण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Aug 29, 2020 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).