IPL 2020 Update: UAE ला फक्त 24 खेळाडूंना घेऊन जाता येणार, 'या' 3 फ्रँचायझींना वगळावे लागणार प्रत्येकी एक खेळाडू
File image of RCB players (Photo Credits: IANS)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 पाहण्याची उत्साही चाहत्यांची प्रतीक्षा अखेर लवकरच संपुष्टात येणार आहे. बीसीसीआय (BCCI) संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. भारतभरात कोविड-19 (COVID-19) प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे बीसीसीआयकडे लीग पूर्णपणे वेगळ्या देशात हलवण्यावाचून दुसरा पर्याय उरला नव्हता. कोविड-19च्या काळात खेळाडू तसेच सहाय्यक कर्मचार्‍यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कठोर नियमांनुसार आयपीएल खेळला जाईल. युएईच्या (UAE) मातीवर नेट्समध्ये सरावासाठी उतरण्यापूर्वी खेळाडूंची कमीतकमी पाच वेळा कोरोना व्हायरस (Coronavirus) टेस्ट केली जाईल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नुकताच खुलासा केला आहे की सर्व भारतीय खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना आपापल्या संघात सामील होण्यापूर्वी एका आठवड्यात 24 तासांच्या अंतरावर दोन कोविड -19 RT-PCR टेस्ट करून घ्याव्या लागतील. (IPL 2020 Update: UAE येथे आयपीएलला सरकारची तत्त्वत: मान्यता, बीसीसीआयचा दावा; फ्रँचायझींकडून खेळाडूंची क्वारंटाइन प्रक्रिया सुरू)

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत फ्रँचायझी प्रत्येक संघातील जास्तीत जास्त 24 खेळाडूंसह युएईला जाऊ शकतात असा निर्णयही घेण्यात आला. परंतु स्पर्धेदरम्यान फ्रँचायझींना त्यांच्या खेळाडूंना कोविड-19 अंतर्गत खेळाडू बदलण्याची परवानगी दिली. तथापि, 24 खेळाडूंसह स्पर्धेत प्रवेश करण्याच्या निर्णयामुळे काही फ्रेंचायझीना फटका बसला आहे. गतवर्षी आयपीएलच्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादने प्रत्येकी 25 खेळाडूंची निवड केली होती. त्यामुळे, युएईला रवाना होण्यापूर्वी त्यांना त्यांच्या संघातून प्रत्येकी एक सदस्य वगळावा लागेल.

तीन फ्रेंचायझीच्या खेळाडूंची संपूर्ण यादी येथे पाहा:

किंग्ज इलेव्हन पंजाब: क्रिस गेल, मयंक अग्रवाल, करुण नायर, सरफराज खान, मनदीप सिंह, शेल्डन कॉटरल, ईशान पोरेल, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, अर्शदीप सिंह, हार्डस विल्जॉईन, एम अश्विन, जगदीशा सुचित, हरप्रीत ब्रार, दर्शन नलकंडे, ग्लेन मॅक्सवेल, जिमी नीशम, क्रिस जॉर्डन, कृष्णाप्पा गौथम, दीपक हूडा, तजिंदर सिंह ढिल्लन, केएल राहुल (कॅप्टन), निकोलस पूरन, प्रभसिमरन सिंह.

सनरायझर्स हैदराबाद: केन विल्यमसन, डेविड वॉर्नर (कॅप्टन), मनीष पांडे, विराट सिंह, प्रियम गर्ग, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, टी नटराजन, अभिषेक शर्मा, शाहबाज नदीम, मिशेल मार्श, फेबियन एलन, विजय शंकर, मोहम्मद नबी, रशीद खान, संजय यादव, जॉनी बेयरस्टो, रिद्धिमान साहा, श्रीवत गोस्वामी, बावनका संदीप, बसील थम्पी.

राजस्थान रॉयल्स: महिपाल लोमरोर, मनन वोहरा, रियान पराग, स्टीव स्मिथ (कॅप्टन), रॉबिन उथप्पा, डेविड मिलर, अंकित राजपूत, मयंक मारकंडे, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, वरुण आरोन, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, आकाश सिंह, ओशेन थॉमस, एंड्रयू टाई, बेन स्टोक्स, राहुल तेवतिया, शशांक सिंह, यशस्वी जायसवाल, अनिरुद्ध जोशी, टॉम कुरेन, जोस बटलर, संजू सैमसन, अनुज रावत.