आयपीएल टायटल स्पॉन्सरच्या लढतीत बाबा रामदेवच्या 'पतंजली'ची उडी (Photo Credit: Twitter)

यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 अगोदर प्रशासकीय समितीने या स्पर्धेबाबत अनेक निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. बैठकीत आगामी आयपीएलसाठी (IPL) 'विवो' सह सर्व प्रायोजक राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि, बीसीसीआयच्या (BCCI) या निर्णयाने टीका करण्यात आली. भारत-चीनमधील संबंध (India-China Relations) लक्षात घेता अनेक चाहत्यांनी विवोसह भारतात कार्यरत असलेल्या चिनी कंपन्यांचा बहिष्कार घालण्याची मागणी करण्यात आली. गेल्या काही आठवड्यांमध्ये दोन्ही देशांमधील सीमा वादामुळे त्यांच्या नाती खराब झाल्या आहेत. पण, सोशल मीडियावरील टिकेनंतर विवोने शीर्षक प्रायोजकत्वाच्या (VIVO Title Sponsor) करारातून माघार घेतली. 'विवो' बाहेर पडण्यामुळे अनेक भारतीय कंपन्या यंदा आयपीएलचे प्रायोजकत्व मिळविण्याच्या शर्यतीत उतरल्या आहेत. आणि अहवालानुसार योगगुरू बाबा रामदेव यांची 'पतंजली' (Patanjali) शीर्षक प्रायोजकत्वासाठी बोली लावण्याचा विचार करीत आहे. (IPL 2020 Title Sponsorship: आयपीएल च्या यंदाच्या टायटल स्पॉन्सरशीप साठी Amazon, Unacademy, Jio ची नावं चर्चेत)

“पतंजली ब्रँडला जागतिक विपणन व्यासपीठ मिळावे अशी आमची इच्छा असल्याने आम्ही यावर्षी आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वावर विचार करीत आहोत,” पतंजलीचे प्रवक्ते एस के तिजरावाला यांनी पतंजलीबाबत इकॉनॉमिक टाइम्सला बीसीसीआयसमोर आपला प्रस्ताव ठेवण्याच्या विचाराला दुजोरा दिला. तथापि, मार्केट तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ब्रँडला बहुराष्ट्रीय कंपनीची स्टार पॉवर नाही आहे. दरम्यान, विवोच्या बाहेर पडल्यानंतर जिओ, ऍमेझॉन, टाटा ग्रुप, ड्रीम 11 आणि बायजू या सारख्या अनेक कंपन्या देखील रिंगणात उतरले आहेत.

अलीकडेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही 'विवो'च्या बाहेर पाडण्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि म्हटले होते की त्याला आर्थिक संकट म्हणू नये. "मी यास आर्थिक संकट म्हणून संबोधणार नाही," गांगुली यांनी लर्नफ्लिक्सने आयोजित केलेल्या वेबिनार दरम्यान बोलताना म्हटले होते. “मोठ्या गोष्टी रात्रभरात होत नाहीत. आणि मोठ्या गोष्टी एका रात्रीत जात नाहीत. दीर्घ काळासाठी आपली तयारी आपल्याला नुकसानास सज्ज करते, यश मिळविण्यासाठी तयार करते.”