IPL 2020 (Photo Credits : Twitter /@IPL)

इंडीयन प्रिमियर लीग (IPL) मध्ये Vivo ची टायटल स्पॉन्सरशीप संपुष्टामध्ये आल्यानंतर आता नव्या कंपन्यांची चर्चा सुरू झाली आहे. 2020 सालच्या आयपीएल स्पर्धांसाठी आता आता ई कॉमर्स किंवा ई लर्गिंगमधील काही कंपन्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या टायटल स्पॉन्सरशीपच्या शर्यतीमध्ये Amazon, Unacademy, Jio यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. IPL 2020 Sponsorship: आयपीएलचे मुख्य प्रायोजक म्हणून चिनी मोबाइल कंपनी VIVO चा करार यंदासाठी स्थगित, BCCI कडून अधिकृत घोषणा.

मार्केट अ‍ॅनालिस्टच्या अंदाजानुसार, 'जी कोणी कंपनी आता आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपसाठी पुढे येईल आणि ती मिळवेल ही त्यांच्यासाठी फायद्याचीच गोष्ट अधिक असेल. सध्या कोरोना संकटामुळे आर्थिक व्यवस्था पाहता ई कॉमर्स किंवा ई लर्निंगमधून एखादं नाव/ कंपनी पुढे येण्याची शक्यता आहे. स्टार्ट अपमधून कुणी पुढे येईल अशी आशा नाही. सध्या बीसीसीआय कुटुंबाचा भाग असलेली Byju ही ई लर्निंग अ‍ॅप्सचि संस्थादेखील बिग तिकीट इव्हेंट करू शकते. सध्या क्रिकेट विश्वासोबत नाव जोडण्यासाठी Unacademy देखील उत्सुक असल्याचेदेखील विसरून चालणार नाही' असे IANS सोबत बोलताना त्यांनी सांगितले आहे.

आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसांवर दिवाळी असल्याने ई कॉमर्स साईट्सदेखील या इव्हेंट्सचा फायदा मिळवून घेऊ शकतात. अमेझॉन, फ्लिपकार्टसाठी मोठी संधी आहे.

दरम्यान अ‍ॅड फिल्म मेकर प्रल्हाद कक्कड यांच्यानुसार कोरोना संकटकाळात फार्माकंपनींनादेखील मोठा फायदा झाल्याने त्यांच्यापैकी काहीजण पुढे येऊ शकतात. पण अमेझॉन महत्त्वाच्या भूमिकेत दिसू शकते. सध्या लॉकडाऊनमुळे सारेच घरामध्ये असल्याने अनेकजण टीव्हीला खिळून बसले आहेत. अशामध्ये कोणत्याही सेक्टरमधील कंपनी पुढे आली तरी त्यांच्यासाठी फायदा असल्याचं मत प्रल्हाद कक्कड यांनी IANS शी बोलताना व्यक्त केले आहे.

एका मार्केट एक्सपर्टच्या माहितीनुसार,जिओ देखील टायटल स्पॉनरशिपसाठी पुढे येऊ शकतो. जिओ हा एक ब्रॅन्ड आहे. त्यांचे 8 टीम्ससोबत संबंध आहेत. केवळ टेलिकॉम इंड्स्ट्रीची पार्श्वभूमी असल्याने त्यांना मागे ठेवण्यात अर्थ नाही. त्यांची इच्छा असेल तर त्यांच्यात क्षमता देखील आहे.