आयपीएल (IPL) फ्रँचायझी, किंग्ज इलेव्हन पंजाबचे (Kings XI Punjab) खेळाडू मोहम्मद शमी (Mohammed Shami), मनदीप सिंह आणि वसीम जाफर (Wasim Jaffer) इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) आगामी 13 व्या हंगामासाठी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे रवाना झाले आहे. युएईसाठी (UAE) रवाना होणारी किंग्स इलेव्हन पहिली फ्रँचायझी आहे. 53-दिवसीय आयपीएल (IPL) स्पर्धा होणार असून यामध्ये दुपारी 13:30 वाजता आयोजित होतील, तर रात्रीचे सामने 7:30 वाजता खेळले जातील. आयपीएल यंदा युएईमध्ये तीन स्टेडियममध्ये खेळले जाईल. आयपीएलचा पहिला सामना 4 वेळा विजेता मुंबई इंडियन्स आणि 3 वेळा विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सप्टेंबर 19 रोजी होईल. आयपीएल 2020 स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जाईल. भारतीय ब्रॉडकास्टरने एकाधिक भाषांमध्ये आणि एकाधिक नेटवर्क चॅनेलवर स्पर्धा प्रसारित करण्याची व्यवस्था केली आहे. (Ashwin Mankad Run-Out in IPL 2020: रविचंद्रन अश्विनला दिल्ली कॅपिटल्सकडून नाही करता येणार 'मंकड रनआऊट', 13 व्या सीजनपूर्वी रिकी पॉन्टिंगने दिली चेतावणी)
महामारीच्या पार्श्वभूमीवर देशातील क्रिकेटपटू मार्चपासून खेळापासून दूर आहेत. आणि युएईमध्ये बहुप्रतिक्षित आयपीएलपूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाब सज्ज झाले आहेत. युएईच्या फ्लाइटमध्ये चढल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने खेळाडूंचे काही फोटो शेअर केले. पोस्ट शेअर करताना KXIP ने लिहिले, "आमच्या फॅन्ससाठी गुड मॉर्निंग गिफ्ट.” पंजाब टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने देखील इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले ज्यात तो मनदीप सिंह आणि दीप हुड्डा सोबत दिसत आहे. शमी किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध होऊ शकतो. पंजाबने त्याला 2018 च्या लिलावात 4.8 कोटीमध्ये खरेदी केले. त्यानंतर त्याने 18 सामन्यांत 21 गडी बाद केले आहेत.
मोहम्मद शमी
पंजाब संघ यावेळी मोठ्या आशेने आयपीएलमध्ये प्रवेश करत आहे. केएल राहुलच्या नेतृत्वातील टीम सोफिटेल द पाम, दुबई येथे मुक्काम करेल जे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) पाम जुमेराहपासून 500 मीटर अंतरावर आहे. रविचंद्रन अश्विनच्या ट्रेडिंगनंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचे कर्णधारपद यंदा टीम इंडियाचा स्टायलिश क्रिकेटर केएल राहुलला देण्यात आली आहे. यंदा आयपीएलचा 13 वा हंगाम 19 मार्चपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्यानंतर आयपीएल युएईमध्ये खेळणे निश्चित झाले.