आगामी इंडियन प्रीमियर लीगसाठी (Indian Premier Leageu) चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) शुक्रवारी प्री-हंगाम शिबिर सुरू करणे अपेक्षित होते, पण युएई (UAE) येथील सहा दिवसांचा अनिवार्य क्वारंटाइन कालावधी त्यांनी वाढवण्याचं निर्णय घेतला आहे. सीएसकेच्या (CSK) तुकडीतील अनेक सदस्यांची कोविड-19 टेस्ट पॉसिटीव्ह आल्यानंतर फ्रँचायझीने हा निर्णय घेतला असल्याचे आता अहवालात म्हटले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, यलो आर्मीने हा निर्णय घेतला कारण सीएसकेच्या तुकडीतील काही सदस्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दुबईमध्ये आल्यानंतर सदस्यांना कोरोनाची लागण आली असल्याचे अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे, सूत्रांनी इंडिया टुडेला समर्थक कर्मचारी आणि एका वेगवान गोलंदाजासह 12 सदस्यांची कोरोना टेस्ट सकारात्मक असल्याची पुष्टी केली आहे. सर्व सदस्य आता आयसोलेशनमध्ये गेले आहेत. (IPL 2020 Schedule Update: कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ, अबू धाबीतील निर्बंधामुळे आयपीएल 13 चे वेळापत्रक जाहीर करण्यात विलंब- रिपोर्ट)
एका खेळाडू व्यतिरिक्त 12 जणांना, जे सपोर्ट स्टाफ आणि सोशल मीडिया टीमचे सदस्य असल्याचे सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले. चेन्नई सुपर किंग्जमधील सर्व सदस्य ज्यांनी कोरोना टेस्ट सकारात्मक केली त्यांची स्थिती स्थिर आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एसओपीच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सीएसके सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे अनुसरण करीत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज सदस्यांनी दुबईतील आपला 6 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला परंतु प्रशिक्षण पुन्हा सुरू केले नाही. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबसह काहींनी यापूर्वीच प्रशिक्षण सुरु केले आहे.
दरम्यान, यामुळे आता संपूर्ण सीएसके पथक दुबईमध्ये त्यांच्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन झाला आहे. सीएसके किंवा बीसीसीआयने अद्याप या घडामोडींची पुष्टी केली नसली तरी, चेन्नईतल्या शिबिरात सहाय्यक कर्मचारी आणि सोशल मीडिया टीमच्या सदस्यांनी या विषाणूचा संसर्ग झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कर्णधार एमएस धोनी आणि उपकर्णधार सुरेश रैनासह सीएसके पथकाचा एक भाग 21 ऑगस्ट रोजी चेन्नईत 5 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरानंतर दुबईला दाखल झाला. या प्रशिक्षण शिबिरात धोनी, रैनासह पीयूष चावला, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर देखील सामील होते.