IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पराभव करत मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सहाव्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक मारली. या दरम्यान, मुंबईला एक मोठा धक्का बसला आहे. स्पर्धेत यंदा संघासाठी दुसऱ्या सर्वाधिक विकेट घेणाऱ्या ट्रेंट बोल्टला (Trent Boult) सामन्यादरम्यान दुखापत झाली. बोल्टने पहिल्या ओव्हरमध्ये दोन गडी राखून गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेला खातं न उघडताच माघारी धाडलं. बोल्टने 2 षटकांत 1 मेडन ओव्हर टाकत 2 गडी बाद केले. मात्र, यानंतर त्याला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागला आणि आपल्या कोट्याचे ओव्हर देखील तो पूर्ण करू शकला नाही. सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) बोल्टच्या दुखापतीसंदर्भात एक अपडेट दिला. मुंबईला आता 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळायचा आहे, त्यामुळे बोल्टला फिट होण्यासाठी आवश्यक वेळ मिळणार आहे. (IPL 2020: टॉप ऑर्डरच्या अपयशानंतर दिल्ली कॅपिटल्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'Stop the Count' ट्विटने स्वतःचीच उडवली खिल्ली)
"मी अद्याप त्याला पाहिले नाही परंतु तो ठीक दिसत आहेत. मला वाटत नाही की तिथे एक मोठी समस्या आहे. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा मैदानात येईल. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या संघांकडून खेळतात, म्हणून त्यांच्या योजना देखील भिन्न आहेत." यापूर्वी रोहितनेही आपल्या संघाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. रोहित म्हणाला की, ही आमची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. यंदा स्पर्धेत बोल्टने कोणालाही निराश केले नाही. त्याने आपल्या कौशल्यानुसार गोलंदाजी केली ज्याचा संघाला फायदा झाला.
.@ImRo45: I haven't seen Boult and he looks okay. He'll be fine in the next few days and back on the park on the 10th.#OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL #MIvDC
— Mumbai Indians (@mipaltan) November 5, 2020
दरम्यान, दुबईमध्ये खेळलेल्या सामन्यात पहिले फलंदाजी करत मुंबईने 201 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सला 8 विकेट गमावून फक्त 143 धावाच करता आल्या. दिल्लीकडून मार्कस स्टॉयनिसने 46 चेंडूत 65 धावा फटकावल्या. दिल्लीची सुरुवात खूप वाईट झाली आणि संघाने 3 विकेट शून्यावर गमावले. पहिल्या ओव्हरमध्ये बोल्टने पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे तर पुढील ओव्हरमध जसप्रीत बुमराहने धवनला शून्यावर माघारी धाडलं. बुमराहने 4 मोठ्या विकेट्ससह दिल्लीचा डाव सावरू दिला नाही.