IPL 2020: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) क्वालिफायर-1 मध्ये गुरुवारी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) धक्कादायक पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईने ईशान किशनचे (Ishan Kishan) नाबाद अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या 14 चेंडूत तुफानी 37 धावांच्या मदतीने स्कोअरबोर्डवर 200 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान हल्ल्यामुळे दिल्लीचा टॉप-ऑर्डर पत्त्यांसारखा विखुरला. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने दिलखुलासपणे त्यांचा पराभव स्वीकारत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी निवडणुकांबाबत नुकतेच केलेलं ट्विटवर प्रतिक्रिया दिली जे पाहून यूजर्सना देखील त्यांचे हसू अनावर झाले. ट्रम्प यांच्या "स्टॉप द काऊंट!" यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना दिल्लीने ट्विटरवर स्वतःलाच ट्रोल केले आणि लिहिले, “मी ते विकेट्सचे कॉलम अपडेट करणाऱ्या माणसाला सांगताना.” (MI vs DC, IPL 2020 Qualifer 1: दिल्ली कॅपिटल्सचे 3 गडी शून्यावर माघारी; ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्ससाठी केली तुफानी सुरुवात)
मुंबईने दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सचे आघाडीचे तीनही फलंदाज-पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन भोपळाही न फोडता माघारी परतले. मुंबईच्या ट्रेंट बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये पृथ्वी आणि अजिंक्य रहाणेला बाद करत दिल्लीला धावांचा पाठलाग करताना दोन दिले. त्यांनतर पुढील ओव्हरमध्ये बुमराहने शिखर धवनचा त्रिफळा उडवत दिल्लीची स्थिती 0/3 अशी केली. दिल्लीसाठी एकटा मार्कस स्टोइनिसने लढा दिला, पण बाजूने मजबूत साथ मिळाली नाही. पाहा डीसीचे ट्विट:
Me to the guy updating the wickets column 🙄#MIvDC #Dream11IPL #YehHaiNayiDilli https://t.co/WTKYGMPNBS
— Delhi Capitals (Tweeting from 🇦🇪) (@DelhiCapitals) November 5, 2020
दरम्यान, दिल्लीचा पराभव करत मुंबई इंडियन्सने सहाव्यांदा फायनलमध्ये स्थान मिळवले. आयपीएल फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा स्थान मिळवण्याची मुंबईची ही पहिलीच वेळ आहे. दुसरीकडे, मुंबईकडून झालेल्या पराभवांनंतर दिल्लीला फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या एलिमिनेटर सामना खेळला जाईल, ज्यातील विजयी संघ दिल्लीचा दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सामना करेल. 8 नोव्हेंबर रोजी अबू धाबी येथे हा सामना खेळला जाईल.