IPL 2020 Top-5 Best Catches: आयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी घेतले भन्नाट कॅच; 13व्या हंगामात जोफ्रा आर्चर, फाफ डु प्लेसिसचा सुपर कॅच पाहातच राहाल
मुंबई इंडियन्सविरुद्ध जोफ्रा आर्चरचा अफलातून कॅच (Photo Credit: PTI)

IPL 2020 Top-5 Best Catches: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) प्रत्येकी हंगामात खेळाडूंकडून प्रभावी खेळी पाहायला मिळते. प्रत्येक सीजनमध्ये एक नवा फलंदाज, गोलंदाज आपल्या खेळाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. यंदाही काही असेच चित्र पाहायला मिळाले. काही खेळाडू हिट झाले तर काहींनी निराश केले. आयपीएलचा 13वा हंगाम आता आपल्या अंतिम चरणात पोहोचला आहे. चाहत्यांनी आजवर एकापेक्षा जास्त शानदार झेल पाहायला मिळाले आहेत यातील काही कॅचेसने तर संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलून टाकले. मोसमातील सुरुवातीच्या सामन्यात फाफ डू प्लेसिसने (Faf du Plessis) एकाच षटकात दोन झेल घेऊन चेन्नईला मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) विजय मिळवून दिला होता, तर राजस्थान रॉयल्सविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या सामन्यात जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) ईशान किशनचा (Ishan Kishan) जबरदस्त कॅच पकडला जो सामन्याचा गेमचेंजर सिद्ध झाला. (RR vs MI, IPL 2020: संजू सॅमसन, बेन स्टोक्सचा मुंबई इंडियन्सवर हल्लाबोल! राजस्थान रॉयल्सने Table-Toppers वर 8 विकेटने केली मात)

टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजीसह फिल्डिंगचे देखील तितकेच महत्व असते. यंदाही अनेक खेळाडूंनी अफलातून झेल पकडत प्रेक्षकांना चकित केले आहेत. आज आपण पाहणार आयपीलच्या 13व्या हंगामातील 5 सर्वोत्तम कॅच:

1. फाफ डु प्लेसिस

आयपीएलच्या 13 व्या सत्रात सलामीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या डावाच्या 15व्या ओव्हरमध्ये फाफ डु प्लेसिसने दोन शानदार झेल पकडला. रवींद्र जडेजाच्या ओव्हरमध्ये बाउंड्री लाईनवर उभा असलेल्या डु प्लेसिसने पहिले चांगली फलंदाजी करणाऱ्या सौरभ तिवारीचा आणि नंतर ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर हार्दिक पांड्याचे कॅच पकडत मुंबईला दोन मोठे झटके दिले.

2. कीरोन पोलार्ड

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळलेल्या 20व्या आयपीएल सामन्यात पोलार्डने राजस्थानच्या जोस बटलरचा शानदार झेल घेतला. याआधीच पाच षटकार ठोकणार्‍या बटलरने डावाच्या 14व्या षटकात पुन्हा लाँग शॉट खेळला, जो पोलार्डने झेलमध्ये बदलला. पोलार्डने हवेत उडी मारली आणि चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू त्याच्या हातातून उडाला आणि अखेर दुसऱ्या प्रयत्नात पोलार्डने झेल पकडला.

3. लोकी फर्ग्यूसन

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यातील शेवटच्या दोन षटकांत हैदराबादला विजयासाठी 30 धावांची गरज होती.अब्दुल समद आणि वॉर्नरने 19 व्या षटकात केकेआरच्या शिवम मावीच्या पहिल्या 5 चेंडूत 12 धावा काढल्या. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर फर्ग्युसनने शानदार झेल पकडत सामन्याचे चित्रच बदलले. लोकीने सीमारेषेवर समदाचा जबरदस्त कॅच पकडला, मात्र लोकी धावत आल्याने त्याचा वेग इतका जास्त होता की तो सीमारेषेला स्पर्श करणार होता, तेव्हा त्याने चेंडू शुभमन गिलच्या दिशेने फेकला आणि गिलने कॅच पूर्ण करून समदला माघारी पाठवलं.

4. जोफ्रा आर्चर

मुंबई इंडियन्सविरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज गोलंदाज जोफ्रा आर्चरने सीमा रेषेवर ईशान किशनचा जबरदस्त कॅच पकडला. कार्तिक त्यागीच्या चेंडूवर ईशानने हवेत फटका मारला जो सीमारेषे पार जाणार असे दिसत असताना आर्चरने उडी मारत मुंबई इंडियन्स फलंदाजाचा भन्नाट झेल पकडला. आर्चरने पकडलेला कॅच पाहून अन्य खेळाडूंसह खुद्द गोलंदाज त्यागी देखील चकित झाला.

5. एमएस धोनी

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात खेळल्या गेलेल्या 21व्या सामन्यात सीकेकेचा कर्णधार आणि विकेटकीपर एमएस धोनीने केकेआरच्या डावाच्या अंतिम षटकात शिवम मावीचा शानदार झेल घेतला. ड्वेन ब्राव्होच्या षटकातील चौथा चेंडू धोनीकडे मोठ्या वेगाने आला आणि त्याचा पहिला प्रयत्न चुकला, परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्याने धावता डाईव्ह मारली आणि झेल घेतला. या सामन्यात कोलकाताने सीएसकेला 10 धावांनी पराभूत केले.

दरम्यान, आयपीएलमध्ये आजवर 44 समाने झाले आहेत. स्पर्धा आपल्या अंतिम चरणात पोहचली असताना अद्याप प्ले ऑफ संघ निश्चित झालेले नाही. शनिवार आणि रविवारी झालेल्या डबल हेडर सामन्यात गुणतालिकेत आघाडीवर असलेले तीन संघ-मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांना पराभव पत्करावा लागला आहे. अशा स्थितीत आयपीएलच्या प्ले ऑफची शर्यत रंगतदार होत आहे. मात्र, येणाऱ्या पुढील सामन्यात स्पर्धेतील टॉप-4 संघ कोण असतील ते आपल्याला समजेल.