इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) 2020 मुख्य स्पॉन्सर म्हणून बाबा रामदेवच पतंजली आयुर्वेद (Patanjali Ayurveda) अधिकृत प्रस्ताव पाठवू शकते असे वृत्त समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यासंदर्भात काही मजेदार प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केल्या. चिनी कंपनी VIVOनं माघार घेतल्यावर आयपीएलच्या मुख्य स्पॉन्सरसाठी अनेक नावं समोर येत आहे. सोमवार, 10 ऑगस्ट रोजी पतंजली त्या संदर्भात अधिकृत प्रस्ताव भारतीय क्रिकेट बोर्डाकडे पाठवू शकते असेपीटीआयने वृत्तात म्हटले. पतंजली प्रवक्ते एस. के. तिजारावाला यांनी सांगितले की, "आम्ही पतंजली ब्रँडला जागतिक विपणन मंच देऊ इच्छित असल्याने आम्ही यावर्षी आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वावर विचार करीत आहोत." हे वृत्त समोर येताच चाहत्यांनी आयपीएलचे विजेतेपद प्रायोजक म्हणून पतंजलीसह नवीन लोगो, चीअरलीडर आउटफिट्स, कोरियोग्राफी इत्यादीमध्ये बदल करण्याचा इशारा देत काही भन्नाट ट्विट केले. (IPL 2020 Sponsorship Tender: आयपीएल स्पॉन्सरशिपसाठी BCCIने काढला टेंडर, 300 कोटींसह 'या' अटींचा आहे समावेश)
आयपीएलचे टायटल स्पॉन्सर लोगो कसा असेल यावरही सोशल मीडिया यूजर्समध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मजेदार मिम्सच्या माध्यमातून यूजर्सने नवीन लोगो, सामनावीर पुरस्कार, चीअरलीडर्ससाठी नवीन पोशाख इत्यादींचा अंदाज वर्तवला. काही मिम्स आणि प्रतिक्रिया येथे पाहा...
पतंजली आयपीएलमध्ये चीअरलीडर्ससाठी नवीन ड्रेस कोड
Cheerleading in #PatanjaliIPL will be like pic.twitter.com/MCNT0G20PL
— HARSH 🇮🇳 (@Nationalist1110) August 10, 2020
आयपीएल लोगो
IPL logo after Patanjali becomes its title sponsor#PatanjaliIPL pic.twitter.com/xzAGzcyF6q
— Akash (@vaderakash) August 10, 2020
एमएस धोनीला "दंत कांती प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड...
Patanjali to Bid for IPL sponsorship...
Can't wait to see MSD getting "Dantkanti Player Of The Match Award...🏏😍😂
— Bibhu (@Bibhu237) August 10, 2020
आयपीएल 2020 युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार असून ही स्पर्धा 53 दिवस चालणार आहे. पहिल्यांदा आयपीएलचा अंतिम सामना रविवारखेरीज इतर दिवशी (मंगळवार) खेळला जाईल.भारतातील चिंताजनक कोरोना व्हायरस परिस्थितीमुळे युएईमध्ये संपूर्ण स्पर्धा घेण्यात येत आहे. या महिन्याच्या शेवटी सर्व संघ युएई येथे रवाना होतील.