रुतुराज गायकवाड (Photo Credit: Instagram/chennaiipl)

चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) युवा फलंदाज रतूराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) तब्बल एक महिन्यानंतर घातक कोरोना व्हायरसवर (Coronavirus) मात केली आणि संघाच्या सराव सत्रात सामील झाला आहे. फ्रँचायझीने ही बातमी जाहीर करण्यासाठी ट्विटर पोस्ट शेअर केली. पोस्टमध्ये, गायकवाडला पॅड्स आणि हातात बॅट घेऊन उभे असलेले पाहिले जाऊ शकते. सीएसकेने (CSK) रविवारी सायंकाळी सराव सत्र आयोजित केले होते आणि रुतुराज देखील हजर होता. पहिल्याच सामन्यात गरजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलची (IPL) सुरुवात विजयाने केली. या रुतुराजच्या रुपात संघाला एक चांगली बातमी मिळाली आहे. रुतुराजचा आयसोलेशन कालावधी संपला असून त्याने सरावालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात तो मैदानावर दिसू शकतो. सीएसकेच्या दिपक चाहरसोबत कोरोनाची लागण होणाररुतुराज दुसरा खेळाडू होता. (MI vs CSK IPL 2020: फाफ डु प्लेसिसने एकाच ओव्हरमध्ये पकडले दोन अफलातून कॅच, पाहून तुम्ही देखील व्हाल चकित Watch Video)

दीपकने लवकर कोरोनावर मात केली, मात्र रुतुराजला दीर्घ काळ आयसोलेशनमध्ये राहावे लागले. गेल्या आठवड्यात त्याच्या दोन टेस्ट सकारात्मक झाल्यावर त्याला अजून क्वारंटाइन राहावे लागले होते. नंतर आठवड्यात, त्याची एक कोविड टेस्ट नकारात्मक आली. रुतुराजची दुसरी कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्यावर त्याला साथीदारांमध्ये सामील होण्यास परवानगी दिली. बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार त्याने फिटनेस टेस्टदेखील पास केली असून रविवारी सराव सत्रात भाग घेतला. पाहा CSK ची पोस्ट-

गायकवाड व दीपक चाहरव्यतिरिक्त 11 कर्मचार्‍यांनाही व्हायरसची संसर्गाची सकारात्मक लागण झाली होती. सीएसके कॅम्पमधील सर्व 13 लोक आता सावरले आहेत आणि सुरुवातीच्या खेळात चाहर सीएसकेच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. सुरेश रैना यांची बदली म्हणून गायकवाडला त्याच्या संधी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागेल. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना फाफ डु प्लेसिसने मुंबई इंडियन्सविरूद्ध नाबाद 58 धावांनी सामना जिंकला. पुढील दोन सामन्यात जर मुरली विजय साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला तर रुतुराज प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची जागा घेऊ शकतो.