रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

मागील दिवशी दिवसभर चाहत्यांना संशयात ठेवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) अखेर त्यांचा नवीन लोगोच अनावरण केलं. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या फ्रँचायझीचा सोशल मीडिया अकाउंट्स-इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवरील फोटो आणि पोस्ट दिलीत केले. यामुळे चाहते आणि त्यांचे खेळाडूही चकित झाले. गुरुवारी ट्विट करून सांगितले की त्यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूबवरील फोटो काढून टाकले आहेत. याचे कर्णधार विराट कोहली, फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि एबी डिव्हिलियर्स यांना कळताच त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आणि आपले वाचन पूर्ण करत आरसीबीने त्यांचा नवीन लोगो आणि नावाचे अनावर केले. फ्रँचायझीने त्यांचे फोटो काढून टाकल्यानंतर कर्णधार कोहली, डिव्हिलियर्स, चहलने काय झाले असे विचारून ट्विटवरून चिंता व्यक्त केली. केवळ प्रोफाइल फोटोजच नाहीत तर आरसीबी (RCB) सोशल मीडियावरून विचित्र काव्यात्मक कोट शेअर केले ज्यामुळे यूजर्सचा अधिक गोंधळात उडाला.

नवीन लोगो लाल पार्श्वभूमी, सोनेरी सिंह आणि काळ्या रंगात टीमच्या नावासह बोल्ड आहे. आरसीबीने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि लोगोचे अनावरण केले. त्यांनी हे कॅप्शन दिले, "बस एवढेच. ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहात. नवीन दशकात, नवीन आरसीबी, नवीन लोगो! # प्लेबॉल्ड". मात्र, नवीन लोगोवर चाहत्यांची प्रतिक्रिया तथापि काही खास दिसली नाही. आरसीबीने फक्त त्यांचा लोगोच नाही तर त्यांचा नाव देखील बदलले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे आता नवीन नाव रॉयल चॅलेंजर्स (Royal Challengers) असेल.

माझी प्रतिक्रिया

फरक समजत नाही

याच्यासाठी 3 दिवसापासून रहस्य

आरसीबीने मंगळवारी प्रायोजक म्हणून मुथूट फिनकॉर्प बरोबर 3 वर्षांचा करार केला आहे. त्याअंतर्गत खेळाडूंच्या जर्सीच्या समोरच्या बाजूला मोथूटचा लोगो दिसेल. 13 वा हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार आहे, आयपीएल (IPL) गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी क्रिकबझला दुजोरा दिला. 24 मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होईल.