दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज रात्री कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) सामना करण्यासाठी स्टिव्ह स्मिथचे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) सज्ज आहेत. अंडरडॉग्स म्हणून प्रारंभ केल्यावर, रॉयल्सने आयपीएलमध्ये (IPL) तुफान कामगिरी केली आणि मागील सामन्यात आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम त्यांनी मोडला. प्रत्येक सामन्याआधी रॉयल्स आपल्या सोशल मीडियावर ते विजयाचा दावा करण्यास तयार आहेत हे दाखवून देतात पण, यावेळी त्यांनी वेगळा मार्ग निवडला. राजस्थानने यंदा ट्विटरवरून कोलकातावर निशाणा साधला आणि 'Don' मूव्ही थीम निवडून नाईट रायडर्सविरुद्ध संघर्षासाठी आपण तयार आहेत हे दाखवून दिले. राजस्थानने एक व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले, "आज 11 रॉयल्सला असेल नाईट्सची प्रतीक्षा". अखेर त्यांनी व्हिडिओमध्ये लिहिले,“रॉयल्स को रोकना मुश्किल ही नहीं…” (RR vs KKR, IPL 2020 Live Streaming: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Disney आणि Star Network वर)
राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील आयपीएल समान दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाईल. राजस्थान आणि कोलकाताचा आयपीएलमध्ये हा तिसरा सामना असेल. राजस्थानच्या आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास ते विजयाची हॅटट्रिक करतील, तर कोलकाता आपल्या दुसऱ्या विजयाच्या शोधात असतील. राजस्थान रॉयल्स विरुद्ध केकेआरमधील सामना भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल आणि ऑनलाईन हा सामना डिस्नी+ हॉटस्टारवर पाहता येईल. पाहा राजस्थानने शेअर केलेला व्हिडिओ:
Aaj 11 Royals ko intezaar hoga Knights ka. 👀#HallaBol | #RoyalsFamily | #RRvKKR | #IPL2020 pic.twitter.com/Lmm4SiK5mq
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 30, 2020
राजस्थानने आजवर खेळलेल्या आपल्या दोन्ही सामन्यात 200 हुन अधिक धावा केल्या आहेत, मात्र त्यांनी हे दोन्ही सामने शारजाह स्टेडियम येथे खेळले आहेत. टीमकडून फलंदाजांनी आजवर चमकदार कामगीरी केली असली तरी त्यांची सध्या मोठी चिंता त्यांची गोलंदाजी आहे. फलंदाजांनी प्रत्येक वेळी दोनशे हुन अधिकचा स्कोर करून दिला असला तरी गोलंदाजांनी मात्र निराश केले. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्यांनी पहिले फलंदाजी करून 216 धावा केल्या असल्या तरी सीएसकेने देखील अखेरीस 200 धावांपर्यंत मजल मारली. अशा स्थितीत रॉयल्स गोलंदाजांकडून आगामी सामन्यात उढावदार कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, केकेआरची मधलीफाळी कमजोर आहे आणि टॉम कुरन, जोफ्रा आर्चरच्या जोडीसमोर ते संघर्ष करताना दिसू शकतात. केकेआरकडून मागील सामन्यात शुभमन गिलने सलामीला येत मोठा डाव खेळला होता, तर इयन मॉर्गनने फिनिशरची भूमिका बजावली.