Indian Premier League Standings 2020: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमियर लीग यंदा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दहावा सामना सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळरू विरुद्ध मुंबई इडियन्स यांच्यात सुरु पार पडला होता. या सामन्यात बंगळरूच्या संघाने मुंबईवर थरारक विजय मिळवला आहे. ज्यामुळे आयपीएल 2020च्या गुणतालिकेत बऱ्याच हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. तसेच या स्पर्धेत यापुढे अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. यामुळे कोणता संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणार? आत्तात यावर चर्चा करणे चुकीचे आहे. याशिवाय, यंदा प्ले-ऑफमध्ये काही नवीन संघ पहिल्या चारमध्ये सामील होतील की नाही? हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे
आयपीएलच्या पहिल्या दहा सामन्यांनंतर गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स प्रत्येकी 2 विजयांसहीत 4 गुणांसोबत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहेत. नेट रनरेटच्या हिशोबाने दिल्ली कॅपिटल्स राजस्थान रॉयल्सपेक्षा सरस असल्याने दिल्ली अव्वल स्थानी आहे. पंजाब, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, बंगळुरु हे पाचही संघांनी प्रत्येकी एका विजयासहीत दोन गुण मिळवले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर किंग्ज इलेव्हन पंजाब, चौथ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळरू, पाचव्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स, सहाव्या क्रमांकावर कोलकाता नाईट राईडर्स, सातव्या क्रमांकावर चेन्नईसुपर किंग्ज आहे. तर, मालिकेतील आपले पहिले दोन्ही सामने गमावल्याने सनरायझर्स हैदराबादला अजून गुणतालिकेमध्ये भोपळाही फोडता न आल्याने ते तळाशी आहेत. हे देखील वाचा- RCB Beat MI , IPL 2020: सुपर ओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाचा मुंबई इंडियन्सवर थरारक विजय
आज 29 सप्टेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. एकीकडे दिल्ली कॅपिटल्सने दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे हैदराबादच्या संघाला दोन्ही सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे.