आयपीएल (IPL) 2020 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने (Mumbai iIndians) युवा गोलंदाज दिग्विजय देशमुख (Digvijay Deshmukh) याला विकत घेतले. महाराष्ट्राचा 21 वर्षीय वेगवान गोलंदाजाला मुंबईने 20 लाख रुपयांत विकत घेतले आहे. यावर्षी त्याने सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत पदार्पण केले. 17 डिसेंबर रोजी त्याने रणजीमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात 85 धावा करण्याशिवाय त्याने 6 फलंदाजांनाही पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) हे एक व्यासपीठ आहे जे भारतीय क्रिकेटच्या बऱ्याच युवा खेळाडूंना चमकण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःसाठी नाव कमविण्याची संधी देते. लीगच्या लिलावात खेळाडू विकत घेतल्याची आणि मुट्ठीभर संधी मिळण्याची आणि त्यात त्यांनी चमकदार कामगिरी करण्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी बर्याचजणांनी भारतीय जर्सीचा ब्लु रंगही परिधान केला आणि उत्तम कारकिर्दीची नोंद केली. आणि आता या खेळाडूंमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यासाठी भारताचा दिग्विजय देशमुखही यंदा आयपीएलमध्ये प्रयत्नशील असेल. (Where Will I Bat? आयपीएल लिलावात Mumbai Indians ने ढीगभर खेळाडू घेतल्याने रोहित शर्मा ची झाली गोची; फ्रेंचायझीला मारला टोला)
21 वर्षीय या खेळाडूने एक फर्स्ट क्लास आणि 7 टी-20 सामने खेळले आहेत. देशमुखबद्दल मात्र यापेक्षा आणखी एक रोचक गोष्ट आहे आणि ती म्हणजे तो आधीच बॉलिवूड स्टार बनला आहे. देशमुख हा भारतीय क्रिकेटमधील एक अज्ञात नाव आहे, तो आधीच बॉलिवूड अभिनेता आहे. 2013 मधील बहुचर्चित फिल्म 'काई पो चे' (Kai Po Che) मध्ये दिग्विजय झळकला ज्यात सुशांत सिंह राजपूत, अमित साध, राजकुमार राव, मानव कौल हे तिघे मुख्य भूमिकेत होते. दिग्विजयचीही मुख्य भूमिका होती. या चित्रपटात देशमुखने अली हशमीची (Ali Hashmi) भूमिका बजावली. देशमुखने भूमिका बजावली तेव्हा तो 14 वर्षाचा होता. खऱ्या आयुष्यातही चित्रपटातील अली क्रिकेटपटू आहे हे फारच थोड्या लोकांना माहित होते.
Digvijay Deshmukh has acted in a film called " Kai Po Che " when he was 14 year old. 7 years later, @mipaltan has picked him in the IPL auction ahead of the 13th season. #IPL2020 #IPLAuctionhttps://t.co/OqttobtBjw
— Johns (@CricCrazyJohns) December 20, 2019
देशमुखने 2019-20 मध्ये रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतुन प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणि 12 नोव्हेंबर 2019 रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी टी-20 सामन्यात पदार्पण केले. मुंबई फ्रँचायझी नेहमीच नवीन कलागुणांना संधी देण्यासाठी मुंबई ओळखली जाते. यावेळी त्यांनी दिग्विजयला विकत घेतले आहे. दिग्विजय हा वेगवान गोलंदाजीसह खालच्या फळीतही तो वेगवान गोल करू शकतो.