ईशान किशन (Photo Credits: Twitter)

आयपीएल (IPL) 2020 च्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (Chennai Super Kings) सलामीच्या सामन्यासाठी इशान किशनला (Ishan Kishan) प्लेइंग इलेव्हनमधून वगळल्यानंतर मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) चाहते निराश झाले. ईशानच्या जागी मुंबईच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये सौरभ तिवारीला (Saurabh Tiwary) संधी देण्यात आली जो 2017नंतर आपला आयपीएल सामना खेळत आहे. आयपीएल 2019 मध्ये मुंबई इंडियन्सकडून सामान्यतः चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या किशनला सीएसकेविरुद्ध (CSK) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 13 च्या पहिल्या सामन्यातून बाहेर राहावे लागले. 22 वर्षीय खेळाडू बाहेर ठेवल्याने चाहत्यांची निराशा झाली आणि त्याने एमआय कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे तरूण पीठाची बाजू मांडत निराश व्यक्त केली. सौरभ तिवारीने अखेर 2017 मध्ये आयपीएलमध्ये सामना खेळला होता. तो 2017 पासून मुंबई इंडियन्सबरोबर आहे पण त्यावर्षी त्याने एकच सामना खेळला होता आणि त्यानंतर आयपीएलमध्ये तो खेळला नाही. इतकंच नाही तर मागील वर्षी आयपीएल लिलावात त्याला खरेदीही केले गेले नाही. (MI vs CSK IPL 2020: मुंबई इंडियन्सची घसरगुंडी, फलंदाजांचा फ्लॉप शो; चेन्नई सुपर किंग्ससमोर 163 धावांचे लक्ष्य)

तिवारीने मात्र 2017 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळलेल्या एकमेव गेममध्ये अर्धशतक झळकावले होते. दुसरीकडे ईशान किशनने 2017 मध्ये 11 सामने, 2018 मध्ये 14 आणि गेल्या वर्षी सात सामने खेळले. मुंबई इंडियन्सने किशनला सीएसकेविरुद्ध सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन न घेतल्याने चाहत्यांनी कशी प्रतिक्रिया व्यक्त केली ते पहा.

सौरभ तिवारी

निराश फॅन्सची प्रतिक्रिया

आयपीएल 2020 सामन्यातून ईशान किशन आउट

इशान किशनची प्रतिक्रिया

दुर्दैवी इशान किशन

निर्णय कोणी घेतला?

किशनने आयपीएलमध्ये 37 सामने खेळले आहेत आणि तीन अर्धशतकांसह 695 धावा केल्या आहेत, तर तिवारीने 82 खेळले आहेत आणि सात अर्धशतकांसह 1318 धावा केल्या आहेत. दरम्यान, सौरभने चेन्नईविरुद्ध आजच्या सामन्यात एकट्याने खिंड लढवली आणि सर्वाधिक 42 धावा केल्या. तिवारीने 31 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 162/9 धावा केल्या आणि धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव करण्याचा प्रयत्नात असतील.