मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये (Chennai Super Kings) अबू धाबी येथे आयपीएल 13चा पाहिलं सामना खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्ससाठी एमएस धोनीने (MS Dhoni) टॉस जिंकला आणि मुंबईला पहिले फलंदाजीसाठी बोलावले. मुंबईने साजेशी सुरुवात केली, पण आपला फॉर्म कायम ठेवू शकले नाही आणि निर्णधारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 162 धावा केल्या. मुंबई फलंदाजांनी खराब कामगिरीचे प्रदर्शन केले. आता चेन्नईसमोर सलामीच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी 163 धावांचे आव्हान ठेवले. चेन्नईकडून लुंगी एनगीडीने (Lungi Ngidi) 3, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि दीपक चाहर (Deepak Chahar) यांनी प्रत्येकी 2 तर सॅम कुर्रान, पियुष चावला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मुंबई इंडियन्सकडून सौरभ तिवारीने (Saurabh Tiwary) सर्वाधिक 42 धावा केल्या. विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) 33 धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहर नाबाद परतले. आजच्या या 'हायव्होल्टेज' सामन्यात मुंबई आणि चेन्नईमधील कोण बाजी मारेल हे पाहणे औत्सुकतेचे असेल. दोन्ही टीमने सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल केले आहेत. (MI vs CSK, IPL 2020: 'स्लिप ठेवायचं की नाही'? टॉससाठी आलेल्या एमएस धोनीने घेतली रेफरीची फिरकी, पाहा मजेदार Video)
मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने डी कॉकसह डावाची सुरुवात केली. दोघांनी टीमला साजेशी सुरुवात करून दिली. सहा महिन्यानंतर क्रिकेटचा सामना खेळणाऱ्या रोहित आणि डी कॉकने सुरुवातीचे काही ओव्हर जबरदस्त फटकेबाजी केली. एमएस धोनीच्या नेतृत्वातने सामन्यात रंगात आणली. रोहित आणि डी कॉक धोकादायक ठरत असताना त्याने पियुष चावलाकडे चेंडू सोपवला. चावलाच्या फिरकीत रोहित अडकला सॅम कुर्रानकडे कॅच आऊट झाला. रोहितला 10 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावाच करता आल्या. पुढील ओव्हरमध्ये डी कॉक देखील त्याच प्रकारे कॅच आऊट झाला. दोन्ही सलामी फलंदाज 48 धावांवर परतल्यावर सूर्यकुमार यादव आणि सौरभ तिवारी यांनी डाव सांभाळला.
पण चेन्नई गोलंदाजांसमोर मुंबईचे फलंदाज टिकू शकले नाही. सूर्यकुमार 17 आणि सौरभ 42 धावा करून परतले. हार्दिक पांड्या देखील प्रभाव पाडू शकला नाही आणि 10 चेंडूत 2 षटकारासह 14 धावा करून माघारी परतला. हार्दिक आणि सूर्यकुमारने काही फटके लगावले, पण चेन्नईच्या गोलंदाजांनी टीमला पुन्हा कमबॅक करून दिले. कृणाल पांड्या 3 धावा करून परतला. कीरोन पोलार्डने डाव सांभाळला आणि मुंबईचा स्कोर 150 च्या पार नेण्यात भूमिका बजावली. पोलार्डकडून मोठ्या डावाची अपेक्षा होती, पण त्याने निराश केले आणि 18 धावांवर परतला. जेम्स पॅटिन्सनने 11 धावा केल्या.