एमएस धोनी (Photo Credit: Twitter/IPL)

शनिवारी अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सलामी सामन्यासाठी टॉस दरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आरामशीर दिसत होता. आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केल्यावर पहिला स्पर्धात्मक सामन्यात पुनरागमन करणारा सीएसके कर्णधार काही विनोदी मूडमध्ये दिसला आणि मुरली कार्तिकसोबत संघाच्या तयारीवर चर्चा करताना याची झलक त्याने दाखवली. नाणेफेक जिंकल्यानंतर महेंद्र सिंह धोनीला जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर सामाजिक अंतरांच्या नियमाची आठवण झाली. धोनीने विनोद करताना म्हटले की, त्याने आयपीएल 13 मध्ये पहिल्या स्लिपची परवानगी आहे की नाही हे मॅच रेफरीकडून तपासले होते. एमएस धोनी म्हणाला, “म्हणूनच मी मॅच रेफरीला विचारले की तुम्ही प्रथम स्लिप ठेवू शकाल की ते सामाजिक अंतरांच्या नियमांनुसार आहे का”. (MI-CSK Rivalry in IPL: 'मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील स्पर्धेचे आयपीएल यशस्वी होण्यामागे मोठी भूमिका', सचिन तेंडुलकरने व्यक्त केले परखड मत)

धोनीने आयपीएल 2020 च्या मोहिमेची सुरूवात टॉस जिंकून आणि गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरूद्ध गोलंदाजीचा निर्णय घेऊन केली. आयपीएलच्या सलामीच्या साम्यासाठी दोन्ही टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. एकीकडे मुंबईने लसिथ मलिंगाच्या जागी जेम्स पॅटिन्सनला स्थान दिले, तर चेन्नईने ड्वेन ब्रावोला वगळले आणि लुंगी एनगीडीला संधी दिली. चेन्नईने प्लेयिंग इलेव्हनमध्ये मुरली विजय, पियुष चावला आणि लुंगी एनगीडी यांना स्थान दिले आहे. मुंबई संघ कायमच चेन्नईवर भारी पडला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने झाले आहेत. त्यापैकी 18 सामने मुंबईने तर 12 चेन्नईने जिंकले आहेत.

दरम्यान, गेल्या महिन्यात संघ युएईमध्ये आल्यानंतर अनिवार्य क्वारंटाइन कालावधीबद्दल बोलताना धोनी म्हणाला की, कोरोनाने खेळाला ब्रेक लावल्यामुळे खेळाडूंनी आपल्या कुटुंबियांसमवेत दर्जेदार वेळ घालवला होता आणि अचानक रिकाम्या हॉटेलच्या खोल्यांमध्ये स्वतःला पाहणे कठीण होते. दुबईमध्ये वाढीव क्वारंटाइन कालावधीमुळे सीएसकेचा कोणताही खेळाडू निराश झाला नाही, असे धोनीने म्हटले. युएई येथे दाखल झालेल्या सीएसके टीममधील दोन गोलंदाजांसह 13 जण कोरोना  होते. वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि युवा फलंदाज रुतुराज गायकवाडचा यात समावेश होता. दीपक कोरोना मुक्त झाला असून रुतुराजला अद्यापही खेळण्यासाठी मंजुरी मिळाली नाही.