रोहित शर्माचे नेट सत्रात दिग्विजय देशमुखला मिळाले मार्गदर्शन (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) पाचव्या विजेतेपदाच्या प्रयत्नात असलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सध्या नेटमध्ये कसून तयारी करत आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलची (IPL) सर्वात यशस्वी टीम असून संतुलित संघांपैकी एक आहे. आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले असून 19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स पारंपारिक प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध सलामीचा सामना खेळतील. हा सामना अबू धाबी येथे खेळला जाईल. इतर संघांप्रमाणे 4 वेळा आयपीएल विजेता मुंबईने देखील अनेक मंगळ वर्षी झालेल्या लिलावात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे आणि त्यापैकी एक म्हणजे दिग्विजय देशमुख (Digvijay Deshmukh). पहिले आयपीएल खेळणारा दिग्विजय नुकताच मुंबईच्या नेट सेशनमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला. दिग्विजयने नेट सत्रात कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) गोलंदाजी केली. या दरम्यान, रोहित त्याचा मार्गदर्शक बनला आणि त्याला काही टिप्स दिल्या, ज्याचा युवा गोलंदाजाला फायदा झालेला दिसला. (MI IPL 2020 Schedule: पाचव्या विजेतेपदासाठी Mumbai Indians ने कंबर कसली, जाणून घ्या आणि डाउनलोड करा रोहित शर्माच्या टीमचे संपूर्ण वेळापत्रक)

मुंबई इंडियन्सने रोहित आणि दिग्विजयच्या नेट सेशनचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये रोहितने पहिले दिग्विजयचे चार चेंडू खेळले आणि नंतर त्याला बोलावून त्याला तो काय करतोय हे विचारले आणि फक्त चांगल्या लेन्थवर गोलंदाजी करायला सांगितले. 'हिटमॅन' कडून मिलेल्या सल्ल्यानंतर मुंबईच्या या युवा गोलंदाजाने आपली लेन्थ सुधरवली आणि रोहितला इम्प्रेस केले. पाहा व्हिडिओ:

4 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकणारा हा संघ अनेक स्टार्सने सजलेला आहे. रोहित शर्मा, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्य, जसप्रीत बुमराह, क्विंटन डी कॉक आणि लसिथ मलिंगा असे दिग्गज खेळाडू या संघात सामील आहेत. दरम्यान, दुसऱ्यांदा आयपीएल युएईमध्ये आयोजित केले जाणार आहे. 2014 लोकसभा निवडणुकी दरम्यान काही आयपीएल सामने येथे आयोजित करण्यात आले होते. अशा स्थितीत मुंबईला येथील सर्व सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई इंडियन्सचा युएई येथील कामगिरी खराब राहिली आहे, पण यंदा मात्र सांग चित्र बदलू पाहत असेल. मुंबईच्या संघात अनुभवी खेळाडूंसह युवा खेळाडूंची समावेश आहे, जे सामन्यात टीनसाठी विजय मिळवू शकतात.