IPL 2020: दुखापतीमुळे इशांत शर्मा आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता, NCA फिजिओवर होतेय टीका
इशांत शर्मा (Photo Credit: IANS)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या (Ishant Sharma) दुखापतीमुळे त्याच्यासाठी पुन्हा एकदा त्रास वाढला आहे. न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पाच विकेट घेत इशांतला दुखापत झाली आणि त्याला दुसर्‍या कसोटी सामन्यातून माघार घ्यावी लागली. एवढेच नव्हे तर आता स्टार वेगवान गोलंदाजाला आयपीएलच्या (IPL) पहिल्या काही आठवड्यांपासून दूर राहावे लागणार असे दिसत आहे. रणजी करंडक स्पर्धेत दुखापतग्रस्त इशांतने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिजिओच्या देखरेखीखाली त्याच्या दुखापतीवर काम केले आणि पहिल्या टेस्टच्या 72 तासांपूर्वी न्यूझीलंडमध्ये पोहचला. त्यानंतर अवघ्या चार तासांच्या झोपेनंतर त्याने 23 ओव्हर गोलंदाजी केली. आता संपूर्ण प्रकरणाबद्दल बीसीसीआयबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत की, जर इशांत पूर्णपणे सावरला नाही तर त्याला का फिट घोषित केले गेले आहे. (IND vs NZ 1st Test 2020: वेलिंग्टनमध्ये इशांत शर्मा ने 5 विकेट घेत झहीर खान ची 'या' एलिट यादीत केली बरोबरी, मिळवले दुसरे स्थान)

भारतीय संघ व्यवस्थापन अद्याप इशांतच्या स्कॅनच्या निकालाची वाट पाहत आहे पण बीसीसीआयच्या सूत्रांनुसार ईशांतला पुन्हा त्याच ठिकाणी दुखापत झाली आहे, ज्यासाठी त्याला एनसीएमध्ये पाठवण्यात आले होते. या सर्व गोष्टींनंतर आता पुन्हा एकदा फिजिओ आशिष कौशिकबद्दलही टीका केली जात आहे. सध्या सर्वांचे लक्ष इशांतच्या दुखापतीवर आहे आणि आता त्याच्या अनुपस्थितीमुळे संघांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.

रणजी ट्रॉफी सामन्या दरम्यान इशांतला ग्रेड 3 ची दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला 6 आठवड्यां करिता विश्रांती देण्यात आली होती. दिल्ली टीम फिजिओने इशांतला सहा आठवड्यांची विश्रांती दिली असताना एनएसएए टीमने त्याला तीन आठवड्यात परत जाण्याची परवानगी कशी दिली यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहे. इशांतने यापूर्वी पत्रकारांना सांगितले होते की त्याने दोन दिवसांत एनसीएत 21 ओव्हरची कामगिरी केली होती, ज्यानंतर त्याला खेळण्याची परवानगी देण्यात आली. ज्येष्ठ वेगवान गोलंदाजाची दुखापत पुन्हा वर येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारही दुखापतीतून परतला होता, परंतु दुखापत वाढली आणि त्याला टीमच्या बाहेर करण्यात आले.