IPL 2020 च्या आयोजनातून BCCI झाले मालामाल, तब्बल 'इतक्या' कोटींची केली कमाई; आकडा वाचून व्हाल थक्क
आयपीएल 2020 फायनल ट्रॉफी (Photo Credit: PTI)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (Board of Control for Cricket in India) सर्वात मोठी यशोगाथा म्हणजे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएल (IPL) 2020 चे यशस्वीरित्या आयोजन करणे. यापूर्वी मार्च 29 रोजी टूर्नामेंटचे होणारे आयोजन बीसीसीआयने (BCCI) स्थगित केल्यावर तब्बल पाच महिन्यानंतर बोर्डाने 19 सेप्टेंबर रोजी युएई येथे स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. आणि या स्पर्धेमुळे बीसीसीआयचे कोट्यवधींचे नुकसान होण्यापासून वाचले आहे. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमल (Arun Dhumal) यांनी Indian Express ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की स्पर्धेच्या 13व्या आवृत्तीच्या आयोजनामुळे बोर्डाला 4,000 कोटी रुपयांची कमाई करून दिली. याव्यतिरिक्त, आयपीएल 2019 च्या तुलनेत यंदा टीव्ही दर्शक संख्येत 25 टक्के वाढ झाली आहे. (IPL 2020 बनले सर्वात यशस्वी सत्र, दर्शक संख्येने गाठला 31.57 लाखांचा उच्चांक, Star India ची माहिती)

“गेल्या आयपीएलच्या तुलनेत मंडळाने अंदाजे 35 टक्के कपात केली. साथीच्या काळात आम्ही 4,000 कोटी रुपये मिळवले. आमचा टीव्ही व्ह्यूअरशिप जवळपास 25 टक्क्यांनी वाढले आहे, पहिल्या सामन्याला (चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स) आम्हाला आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रेक्षक वर्ग मिळाला आहे. ज्यांना आमच्यावर शंका होती त्यांनी येऊन आयपीएलचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. जर हा आयपीएल झाला नसता तर क्रिकेटपटूंचे एक वर्ष गमावले असते,” धुमल यांनी म्हटले. “तेराव्या हंगामाला सुरुवात होण्यापृवी टेनिसपटू नोवाक जोकोविचला करोनाची लागण झाली होती, ज्यानंतर अनेकांनी आम्हाला आयपीएलचं आयोजन करुन नका असा सल्ला दिला. आमच्यातही थोडं संभ्रमाचं वातावरण होतं. खेळाडूंना काही झालं तर काय करायचं ही भीती मनात होती, पण जय शाह निर्णयावर ठाम होते आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली जाईल असा त्यांना विश्वास होता,” त्यांनी पुढे सांगितले.

बीसीसीआय अधिकाऱ्यांनी हे देखील उघड केले की बोर्डाने 30,000 हून अधिक कोरोना टेस्ट केल्या. आयपीएल सुरळीत आयोजन करण्यासाठी 1500 हून अधिक लोकं सामील होते आणि ही संख्या आश्चर्यचकित करणारी नाही. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबई, अबु धाबी आणि शारजाह अशा तीन मैदानांवर यंदा आयपीएलचे सामने रंगले. मुंबई इंडियन्सने 10 नोव्हेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अंतिम सामन्यात दमदार विजय मिळवला आणि विक्रमी पाचवे विजेतेपद पटकावले.