IPL 2020 Final: DC विरुद्ध आयपीएल फायनल सामन्यात MI कर्णधार रोहित शर्मा 'हे' मोठे पराक्रम करण्याची संधी, वाचा सविस्तर
मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

IPL 2020 Final: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020चा अंतिम सामना रंगणार आहे. आयपीएल फायनलमध्ये (IPL Final) दोन्ही संघ आमने-सामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहेत, तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स पहिले विजेते पद जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. रोहित शर्मा (Rohit Sharma) इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आहे कारण या भारतीय स्टार फलंदाजाने पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. रोहितने डेक्कन चार्जर्स (Deccan Chargers) फ्रँचायझीसोबत 2009 मध्ये त्यानंतर चार मुंबई इंडियन्सबरोबर जिंकले आहेत. 33 वर्षीय फलंदाजाला दुखापतीमुळे काही सामने मुकावे लागले असल्याने यंदाचे आयपीएल भारतीय फलंदाजासाठी काही खास सिद्ध झाले नाही. तथापि, एमआयचा कर्णधार अंतिम सामन्यासाठी तंदुरुस्त आहे आणि काही वैयक्तिक टप्पे साध्य करण्यासाठी सज्ज आहे. (IPL 2020 Final सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी सचिन तेंडुलकरने दिला प्रेरणादायी संदेश, पाहा काय म्हणाला मास्टर-ब्लास्टर Watch Video)

200 आयपीएल सामने

आयपीएल 2020 च्या मुंबई आणि दिल्ली यांच्यातील अंतिम सामन्यात मैदानावर उतरेल तेव्हा तो रोहितचा 200वा आयपीएल सामना असेल. फक्त चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने हिटमनपेक्षा या स्पर्धेत अधिक सामने खेळला आहे. धोनीने 204 आयपीएल सामने खेळले आहेत.

विक्रमी आयपीएल विजेतेपद

रोहित आधीच इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात सुशोभित खेळाडू आहे. 33 वर्षीय रोहितने पाच वेळा ही स्पर्धा जिंकली असून त्यापैकी चार मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून जिंकले आहेत आणि अंतिम सामन्यात जर त्याचा संघ दिल्लीविरुद्ध यशस्वी झाला तर भारतीय क्रिकेटपटू सहावे जेतेपद जिंकेल.

मुंबई इंडियन्ससाठी 4000 धावा

आयपीएलमध्ये 400 धावांचा टप्पा गाठणारा रोहित पहिला मुंबई इंडियन्स खेळाडू बनू शकतो. रोहितला हा टप्पा गाठण्यासाठी फक्त 8 धावांची गरज आहे. यापूर्वी, एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी ही कामगिरी केली आहे.

आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 3000 धावा

आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार रोहित या स्पर्धेत कर्णधार म्हणून 3000  धावा करण्यापासून अवघ्या 43 धावा दूर आहे. धोनी, कोहली आणि गौतम गंभीर यांनी आयपीएलमधील फ्रँचायझींसाठी कर्णधार म्हणून यापूर्वी 3000 हून अधिक धावा केल्या आहेत.

दरम्यान, रोहितसाठी यंदाचा हंगाम फार कठीण गेला असून त्याने यंदाच्या मोसमात 264 धावा केल्या आहेत, ज्या त्याच्या एका मोहिमेतील सर्वात कमी धावसंख्या आहे. एमआय कर्णधाराने फक्त दोन अर्धशतक केले असून तो 24 च्या सरासरीने आणि केवळ 126 च्या स्ट्राइक रेटसह खेळत आहेत.