IPL 2020 Final सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी सचिन तेंडुलकरने दिला प्रेरणादायी संदेश, पाहा काय म्हणाला मास्टर-ब्लास्टर (Watch Video)
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल 2020 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. यपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी एमआय पल्टनसाठी माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांनी प्रेरणादायी संदेश दिला आहे. तेंडुलकर म्हणाले की, मुंबई इंडियन्स जेव्हा खेळायला बाहेर पडतील, संपूर्ण देश त्यांचा समर्थन करेल आणि त्यांना त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी उत्तम कामगिरी करावी लागेल.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आयपीएल (IPL) 2020 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. मंगळवार, 10 नोव्हेंबर रोजी दोन्ही संघ विजेतेपदाच्या सामन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadium) आमने-सामने येतील. आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी एमआय पल्टनसाठी भारत आणि मुंबई इंडियन्सचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी प्रेरणादायी संदेश दिला आहे. तेंडुलकर म्हणाले की, मुंबई इंडियन्स जेव्हा खेळायला बाहेर पडतील, संपूर्ण देश त्यांचा समर्थन करेल आणि त्यांना त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी उत्तम कामगिरी करावी लागेल. मुंबई इंडियन्सने स्पर्धेतील लीग स्टेज 18 गुणांसह पहिल्या स्थानावर राहून संपुष्टात आणले. रोहित शर्माच्या नेतृत्वात संघ विक्रमी पाचव्या विजेतेपदाच्या निर्धारित आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर सचिनने दिलेला मेसेजचा व्हिडिओ शेअर केला. (Mumbai Indians IPL 2020 Road to Final: मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएल फायनलमध्ये, जाणून घ्या सीजन 13 मध्ये कसा होता चॅम्पियन संघाचा प्रवास)
सोशल मीडीयावर एमआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सचिनने नमूद केले की हे केवळ सामान्य उद्दीष्ट्यासाठी काम करणारे व्यवस्थापनच नाही. ते पुढे म्हणाले की मालक आणि चाहतेदेखील रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघास संपूर्ण समर्थन देत आहेत. “मुंबई संघामध्ये जेव्हा एखादा खेळाडू सहभागी होतो, तेव्हा तो एकटा नसतो. त्याला संघमालकपासून सहाय्य्क कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा पाठिंबा असतो. ते सदैव तुमच्याकडून उत्कृष्ट काढून घेण्याच्या प्रयत्नात असतात. मुंबई इंडियन्स हे एक मोठे कुटुंब आहे. इथे सर्वांना चढ-उतांराना सामोरे जावे लागते. तरीही तुमची एकता महत्त्वाची असते. कितीही कठीण परिस्थिती ओढवली तरी सर्वांनी एक संघ म्हणून एकत्र राहिले पाहिजे. विशेष म्हणजे, सध्या टूर्नामेंट वेगाने पुढे जात असताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मला तुम्हा सर्वांवर विश्वास आहे, नक्कीच तुम्ही एकजुटीने राहाल,” 2013 मध्ये मुंबईच्या प्रथम विजेतेपदाच्या संघात असलेल्या सचिनने म्हटले.
🗣️ "When you go out to play for Mumbai Indians, it's not just you, an entire force is with you!" - @sachin_rt #OneFamily #MumbaiIndians #MI #Dream11IPL pic.twitter.com/t83wOFiFDl
— Mumbai Indians (@mipaltan) November 9, 2020
दरम्यान, मुंबई इंडियन्सने यंदा आयपीएलमधील दिल्लीविरुद्ध तीनही सामन्यात तर्फी वर्चस्व गाजवले. आहे. साखळी सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केला असून पहिल्या क्वालिफायरमध्ये देखील मुंबईचा वरचष्मा राहिला आणि 57 धावांनी विजय मिळवत सहाव्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश मिळवला. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध वर्चस्व गाजवले आणि मुंबई इंडियन्स विरुद्ध फायनल सामन्यात लढत निश्चित केली. आयपीएल फायनलमध्ये पोहचण्याची दिल्लीची ही पहिलीच वेळ आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2020 06:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

