IPL 2020 Expensive Players Who Flopped: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 13वा हंगाम खरे संपुष्टात आला. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदाच्या हंगामात चौथ्यांदा पराभूत करून विक्रमी पाचवे विजेतेपद जिंकले. मुंबई इंडियन्स, जगातील कठीण मानल्या जाणाऱ्या टी-20 लीगचे सर्वात यशस्वी फ्रँचायझी बनले. चेन्नई सुपर किंग्सनंतर आपल्या आयपीएल (IPL) विजेतेपदाचा बचाव करणारा मुंबई फक्त दुसरा संघ ठरला. त्यांनी यापूर्वी 2019 मध्ये स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. दरम्यान, अनेक स्वस्त खेळाडूंनी आयपीएल 2020 मध्ये चांगली कामगिरी केली. तथापि, काही महागडे खेळाडू आयपीएल (IPL Expensive Players) 2020 मध्ये पूर्ण फ्लॉप असल्याचे सिद्ध झाले. 2020 हंगामात काही खेळाडूंनी आपल्या शानदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले, परंतु काही असेही खेळाडू आहेत, ज्यांच्यावर फ्रँचायझी संघांनी करोडो रुपयांची बरसात केली, पण त्यांना अपेक्षेनुसार निकाल मिळवता आला नाही. (IPL 2020: आयपीएलमध्ये एकही षटकार नाही मारु शकले 'हे' 3 फलंदाज, पहिले नाव जाणून बसेल धक्का)
अशाच 5 खेळाडूंबद्दल या लेखात जाणून घेऊया, ज्यांना आयीएलच्या 13व्या हंगामात सर्वाधिक रुपये मिळूनही खास प्रदर्शन करता आले नाही.
1. पॅट कमिन्स: यंदाच्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला सर्वाधिक 15.5 कोटी रुपयांचं मानधन देऊन खरेदी केलं होतं, पण केकेआरचा हा गोलंदाज यंदा बॉलने प्रभावी कामगिरी बजावू शकला नाही. कमिन्सला हंगामाच्या सुरुवातीला चेंडूने फारसे यश मिळाले नाही, तर पण त्याने बॅटने प्रभावित केले होते. कमिन्सने यंदा 14 सामन्याच्या 11 डावात एकूण 146 धावा केल्या, तर गोलंदाजीत फ्लॉप ठरला आणि फक्त 12 विकेटच घेतल्या.
2. ग्लेन मॅक्सवेल: आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत झालेल्या फ्लॉप खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका खेळाडूचा समावेश आहे आणि तो म्हणजेच अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल. आयपीएलच्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने मॅक्सवेलला 10 कोटी 75 लाख रुपयांत विकत घेतले होते मात्र, मॅक्सवेलची कामगिरी 1 कोटींला साजेशी ठरेल अशी नव्हती. मॅक्सवेलने पंजाबकडून एकूण 13 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 15.42 च्या सरासरीने 108 धावा केल्या. लक्षात घेण्यासारखे म्हणजे की यंदा हंगामात मॅक्सवेलला एकही षटकार लगावत आला नाही.
3. शेल्डन कॉटरेल: वेस्ट इंडियन गोलंदाजाने आपल्या विकेट सेलिब्रेशन आणि गोलंदाजीमुळे आयपीएलमध्ये स्थान मिळविले. स्विंगचा राजा म्हटल्या जाणाऱ्या या गोलंदाजाला पंजाबने 8.5 कोटींमध्ये संघात सामील केले, पण यंदाच्या हंगामात त्याला अधिक सामने खेळण्याची संधी मिळाली नाही आणि त्याला आपले कौशल्य दाखवता आले नाही. कॉटरेलने 6 सामन्यात फक्त 6 विकेट घेतल्या. त्याने प्रत्येक षटकात 8.8 च्या सरासरीने धावा लुटवल्या ज्यामुळे संघाने पुन्हा त्याला बाहेरचा रस्ता दाखविला.
4. केदार जाधव: सीएसकेचा जाधव यंदा अधिकच चर्चेत राहिला. जाधवला सीएसकेने 2018 मध्ये 7.8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. यंदा जाधवला संपूर्ण आयपीएल 2020 मध्ये संघर्ष करावा लागला आणि त्याने 8 सामन्यात अवघ्या 62 धावा केल्या. तो एकही मॅच-विंनिंग सामना खेळू शकला नाही. तो संघाचा ज्येष्ठ खेळाडू आहे, पण त्याला पुढील हंगामासाठी संघातून बाहेर केले जाऊ शकते.
5. क्रिस मॉरिस: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या या अष्टपैलूला पहिल्या काही सामन्यांतून दुखापतीमुळे मुकावे लागले. मॉरिस एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो पण त्याला 10 कोटी एवढी रक्कम काढण्याची कधीही अपेक्षा करण्यात अली नव्हती. मॉरिसने यंदाच्या हंगामात 9 सामने खेळले ज्यात तो बॅट आणि बॉलने अपयशी ठरला. त्याने केवळ 34 धावा केल्या आणि 11 विकेट घेतल्या.