Dwayne Bravo Injury: CSKच्या अडचणीत वाढ; ड्वेन ब्रावो दुखापतीमुळे आठवड्यांसाठी मैदानाबाहेर राहण्याची शक्यता, प्रशिक्षकाने दिले संकेत
ड्वेन ब्रावो (Photo Credit: Twitter/IPL)

Dwayne Bravo Injury: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super Kings) काहीही चांगले होताना दिसत नाही. शनिवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात संघाला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) 5 विकेटने पराभव पत्करावा लागला. सामन्यादरम्यान दुखापतीमुळे ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo Injury) मैदानात परतू शकला नाही, ज्यामुळे कर्णधार एमएस धोनीला रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) सामन्याचा अंतिम ओव्हर द्यावी लागली. आणि आता चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी ब्रावोच्या दुखापतीबाबत मोठा अपडेट दिला आहे. सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक फ्लेमिंग म्हणाले की, “ग्रोइन दुखापतीमुळे पुढचे काही दिवस किंवा काही आठवडे ब्रावो उपलब्ध होणार नाहीत.” त्यांनी पुढे म्हटले, “ब्रावोची दुखापत बरीच गंभीर होती, आणि त्यामुळे तो मैदानात परतला नाही. सामन्यात अखेरची ओव्हर न टाकल्यामुळे तो स्वतः देखील निराश होता, हे दर्शवते की तो टीमसाठी किती योदान देऊ इच्छितो.” (DC vs CSK, IPL 2020: शिखर धवनचा मास्टर स्ट्रोक! 'गब्बर'च्या शतकाने दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेटने केली मात)

फ्लेमिंग पुढे म्हणाले की येत्या काही दिवसांत त्याची दुखापत पाहावी लागेल. परंतु, यावेळी पुढील काही दिवस किंवा पुढील काही आठवड्यांसाठी तो उपलब्ध होणार नाहीत असे गृहित धरू शकतात. मॅचनंतरच्या सादरीकरणात फ्लेमिंग म्हणाले, “सामन्यादरम्यान ब्रावोला दुखापत झालीदुर्दैव आहे, त्यामुळे तो सामन्यातील शेवटचा षटक फेकू शकला नाही, तो एक महान डेथ-ओव्हर गोलंदाज आहे. हा मोसम आमच्यासाठी आव्हानांनी भरलेला होता. जडेजाची शेवटची ओव्हर टाकेल हे निश्चित नव्हते, परंतु जेव्हा ब्रावो जखमी झाला तेव्हा आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.आम्ही सामन्यात आमची स्थिती चांगली बनविली होती जिथून आम्ही हा सामना जिंकू शकलो असतो. स्पर्धेत परतण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे.”

दिल्ली कॅपिटल संघाला चेन्नईविरुद्ध सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावांची आवश्यकता होती, पण ब्रावोला दुखापत झाल्याने जडेजाने अखेरची ओव्हर टाकली. यामध्ये दिल्लीचा अष्टपैलू अक्षर पटेलने खणखणीत तीन षटकार ठोकले आणि टीमला विजय मिळवून दिला. दुसरीकडे, सीएसकेचा पुढील सामना 19 ऑक्टोबर रोजी राजस्थान रॉयल्सशी होईल.