IPL 2020: CSKचा वेगवान गोलंदाज केएम आसिफने केलं बायो बबल प्रोटोकॉलच उल्लंघन? पाहा काय म्हणाले संघाचे CEO कासी विश्वनाथन
CSKचा वेगवान गोलंदाज केएम आसिफ (Photo Credit: Instagram)

जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी युएईमध्ये (UAE) सुरु असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (Indian Premier League) खबरदारीचा उपाय म्हणून म्हणून प्रत्येक संघाला बायो बबलमध्ये (Bio-Secure Bubble) राहावं लागत आहे व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) वेगवान गोलंदाज केएम आसिफने (KM Asif) बायो बबल प्रोटोकॉलच उल्लंघन केल्याचं वृत्त देण्यात आलं होता. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी बीसीसीआयने (BCCI) सर्व संघांसाठी युएईमध्ये खास सोय केली. टीमच्या गोलंदाजाबद्दल अशी बातमी पसरल्यावर CEO कासी विश्वनाथन (Kasi Viswanarthan) यांनी स्पष्टीकरण जारी केलं आणि वृत्त फेटाळून लावले. एका वृत्तानुसार, आसिफच्या हॉटेलच्या खोलीची चावी हरवली, ज्याची डुप्लिकेट घेण्यासाठी तो रिसेप्शनवर गेला जे बायो-बबलच्या अंतर्गत येत नाही. तथापि, विश्वनाथन यांनी हा अहवाल फेटाळून लावत म्हटले की, आसिफ दुसरी चावी घेण्यासाठी गेला, परंतु त्याने खेळाडूंसाठी नियुक्त केलेल्या डेस्ककडे संपर्क साधला. (IPL 2020: आयपीएल Points Tableमध्ये एमएस धोनीच्या CSKची अंतिम स्थानी घसरण, नेटकऱ्यांनी खिल्ली उडवत केलं ट्रोल, पाहा Tweets)

विश्वनाथन यांनी ANIला सांगितले, “ती बातमी देताना सर्व गोष्टींची माहिती करुन घेण्यात आली होती की नाही हे मला माहिती नाही. संघ ज्या हॉटेलमध्ये आहे तिकडे लॉबीमध्ये एक रिसेप्शन तयार करण्यात आलंय. संघातील खेळाडूंसाठी हॉटेलने वेगळ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. असिफ नक्कीच हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्याकडे गेला नव्हता. त्याच्या खोलीची चावी हरवली होती ही गोष्ट खरी आहे, पण यानंतर नवीन चावीसाठी तो लॉबीमध्ये खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या रिसेप्शन डेस्करवरच चौकशीसाठी गेला होता. खेळाडूंसाठी वेगळा कर्मचारी वर्ग तैनात आहे जिथे ते काही अडचण आल्यास संपर्क साधायचा ही गोष्ट त्याला माहिती आहे. योग्य माहिती न घेता वाजवीपेक्षा हे प्रकरण वाढवण्यात आलं आहे.”

दुसरीकडे, यंदाच्या हंगामात सीएसकेच्या खेळाविषयी बोलायचे झाले तर गुणतालिकेत चेन्नई तीनपैकी एक सामना जिंकून सध्या अंतिम स्थानावर आहे.सीएसकेची पुढील लढत शुक्रवार, 2 ऑक्टोबर रोजी सनरायझर्स हैदराबादशी होईल. दरम्यान, यापूर्वी आयपीएलच्या सुरुवातीआधी सीएसकेच्या दोन गोलंदाजांसोबत एकूण 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना वेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आणि क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना बायो बबलमध्ये सामील करण्यात आले. याशिवाय अनुभवी सुरेश रैना आणि हरभजन सिंह यांनीही वैयक्तिक कारणांमुळे या हंगामातून माघार घेतली होती.