एमएस धोनी, सीएसके कर्णधार (Photo Credit: PTI)

MS Dhoni Retirement Rumors: इंडियन प्रीमियर लीग )Indian Premier League) 2020च्या अबू धाबी येथे सुरू असलेल्या मोसमातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super kings) सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी (Kings XI Punjab) होत आहे आणि आयपीएलमध्ये (IPL) एमएस धोनीचा (MS Dhoni) अंतिम सामना असेल की नाही हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्साहित आहे. आजच्या सामन्याचे भाष्यकार डॅनी मॉरिसन (Danny Morison) यांनी देखील टॉस दरम्यान धोनीला हाच प्रश्न विचारला आणि सीएसके (CSK) कर्णधाराने एपिक प्रतिक्रियेने टीकाकारांना बोलती बंद केली. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) नाणेफेक दरम्यान विचारले. "हा तुमचा पिवळा रंगाच्या जर्सीत शेवटचा खेळ असू शकतो का?" सीएसके यंदाच्या आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकत नसल्याने पुढील हंगामात फ्रेंचायझी मोठ्या प्रमाणात बदल करेल अशी अपेक्षा केली जात आहे. (CSK vs KXIP, IPL 2020: एमएस धोनीने जिंकला टॉस, चेन्नई सुपर किंग्सचा पहिले गोलंदाजीचा निर्णय; मयंक अग्रवालचा पंजाबमध्ये समावेश)

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सीएसके प्ले ऑफसाठी पात्र ठरली नाही. तीन वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज स्पर्धेमधून बाहेर पडणारा पहिला संघ होता. परंतु त्यानंतर सीएसकेने सलग दोन सामने जिंकले आहेत आणि हंगामाचा शेवट गोड करण्यासाठी ते पंजाबविरुद्ध विजय मिळवण्याच्या निर्धारित असतील. धोनी आयपीएलमध्ये सीएसकेकडून अंतिम वेळा खेळत असेल अशी चर्चा सोशल मीडिया यूजर्स आणि अनेकांमध्ये सुरु होती. त्यामुळे नाणेफेकच्या वेळी मॉरियनने धोनीला विचारलेला प्रश्न खूप मोठा होता आणि सुदैवाने चाहत्यांसाठी एमएसडीने जाहीर केले की तो पुन्हा सीएसकेसाठी खेळणार आहे. नाणेफेक जिंकून धोनी म्हणाला, “नक्की पिवळ्या जर्सीत माझा शेवटचा खेळ नाही.”

दरम्यान, धोनीने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध गोलंदाजीची निवड केली. आजच्या सामन्यासाठी सीएसकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. शेन वॉट्सन, मिशेल सॅटनर आणि कर्ण शर्मा यांच्या जागी फाफ डु प्लेसिस, इमरान ताहीर आणि शार्दूल ठाकूर यांना संधी दिली आहे. दुसरीकडे, पंजाबने ग्लेन मॅक्सवेलच्या जागी जेम्स नीशम आणि अर्शदीप सिंहच्या मयंक अग्रवालचा समावेश केला आहे.