Ishant Sharma Ruled Out of IPL: दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! इशांत शर्मा दुखापतीमुळे आयपीएलमधून आऊट
इशांत शर्मा (Photo Credit: Instagram/ishant.sharma29)

Ishant Sharma Ruled Out of IPL: आयपीएल (IPL) 2020 चा पहिला सामना दिल्ली कॅपिटलने (Delhi Capitals) जिंकला. दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला होता, परंतु या सामन्यापूर्वी दिल्लीला इशांत शर्माच्या (Ishant Sharma) रुपात मोठा धक्का बसला. सामन्याआधीच इशांत जखमी झाला होता आणि त्याच्या जागी मोहित शर्माला मैदानात उतरवावे लागले. यानंतर देखील त्याला पुढील दोन सामन्यांना मुकावे लागले. “इशांतला दुबई येथे 20 ऑक्टोबर रोजी संघाच्या प्रशिक्षण सत्रात गोलंदाजी करताना डाव्या पिंजराच्या दुखण्याचा तीव्र दुखापत झाली होती. त्यानंतरच्या तपासणीत त्याच्या डाव्या अंतर्गत तिरकस स्नायूला दुखापत झाल्याचे समोर आले. या दुखापतीमुळे त्याला दुर्दैवाने आयपीएलमधून बाहेर पडावे लागले आहे,” दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या निवेदनात म्हटले. इशांतने आतापर्यंतच्या स्पर्धेत फक्त एक खेळ खेळला होता, जो सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) होता. (Rishabh Pant Injury Update: रिषभ पंतच्या दुखापतीवर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने दिली महत्त्वपूर्ण माहिती, जाणून घ्या)

दरम्यान, इशांत शर्माचे स्पर्धेतून बाहेर पडणे फ्रेंचायझीसाठी मोठा धक्कादायक ठरणार आहे कारण यापूर्वी दुखापतीमुळे ऑफस्पिनर अमित मिश्रा देखील घरी परतला होता. याशिवाय, शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात दिल्लीच्या विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतलाही दुखापत झाल्याचे समोर आले आणि त्यामुळे रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध महत्त्वपूर्ण सामन्यातून त्याला बाहेर बसावे लागले. कर्णधार श्रेयस अय्यरने सामन्यानंतर सांगितले की, पंतला आयपीएल 2020 मधून एक आठवड्यासाठी बाहेर बसावे लागेल. यापूर्वी तो ऑफस्पिनर आर अश्विनच्या खांद्यालाही दुखापत झाली होती, पण तो आता सावरला असून टीमसाठी चांगली गोलंदाजी करत आहे.

दुसरीकडे, सध्या इशांतच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी मिळेल याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. ANIशी बोलताना सूत्रांनी सांगितले की, इशांतच्या बदलीसाठी आयपीएल जीसीला पत्र लिहिले गेले आहे. इशांत आयपीएलमध्ये आतापर्यंत 89 सामने खेळला असून त्याने 71 विकेट्स घेतल्या आहेत. 2011 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना इशांतने कोचीविरुद्ध डावात 12 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. इशांतच्या आयपीएलमधून बाहेर झाल्यामुळे दिल्लीला धक्का बसू शकतो. डीसीचा पुढील सामना बुधवार, 14 ऑक्टोबर रोजी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे.