रोहित शर्मा आणि एमएस धोनी (Photo Credit: PTI)

आयपीएल (IPL) 2020 चे श्रीलंकेत (Sri Lanka) आयोजन करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून (SLC) अद्याप कोणताही प्रस्ताव मिळालेला नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयच्या (BCCI वतीने असे म्हटले गेले की प्रस्ताव आला असला तरी आयपीएल आता आयोजित करण्याविषयी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही कारण कोरोना व्हायरसने (Coronavirus) सर्व जगात लॉकडाउन आहे. यंदा आयपीएलची सुरुवात 29 मार्चपासून होणार होती पण बीसीसीआयने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता आणि नंतर देशात रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवला. त्यामुळे, बोर्डांर अनिश्चित काळासाठी स्पर्धा पुढे ढकलली आहे. (IPL 2020: बीसीसीआयने टूर्नामेंट स्थगित केल्यावर श्रीलंका बोर्डाने आयपीएलचे आयोजन करण्याची दिली ऑफर)

एसएलसीचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी सांगितले की, श्रीलंकामध्ये कोविड-19 संक्रमित लोकांची संख्या फारच कमी असून त्यांच्या देशात ही स्पर्धा आयोजित करण्यास तयार आहे, आणि भारताच्या तुलनेत त्यांच्या देशात लवकरच परिस्थिती सामान्य होईल. गोपनीयतेच्या अटीवर बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “जेव्हा जगातील प्रत्येक गोष्ट ठप्प झाली आहे, तेव्हा बीसीसीआय काही बोलू शकणार नाही.” श्रीलंकामध्ये कोरोना व्हायरसने संक्रमित 200 रुग्णांची नोंद झाली आहेत तर भारतात रुग्णांचा आकडा 12 हजारच्या वर पोहचला आहे.

श्रीलंकेकडून ऑफर मिळण्याबाबत आपली वृत्ती काय असावी, असे या अधिकाऱ्याला विचारले असता ते म्हणाले, “एसएलसीकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि जर आला तर त्यावर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.” यापूर्वी भारतात लोकसभेच्या निवडणुकांमुळे संपूर्ण आयपीएल 2009 दक्षिण आफ्रिकामध्ये खेळवण्यात आले होते, त्यानंतर 2014 मध्ये युएईमध्ये पहिला टप्पा पार पडला. त्यामुळे, बीसीसीआय पुन्हा एकदा आयपीएल भारताबाहेर आयोजन करण्यावर विचार करू शकते असेही म्हटले जात आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता यावर्षी आयपीएल होईल की नाही हे सांगणे कठीण आहे.