IPL 2020: अजिंक्य रहाणे 9 सत्रानंतर सोडणार राजस्थान रॉयल्स संघाची साथ, आता दिल्ली कॅपिटल्स संघाशी जुडण्याची तयारी
अजिंक्य रहाणे (Photo Credit: IANS)

भारतीय टेस्ट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आगामी इंडियन प्रेमिअर लीग (IPL) मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाची साथ सोडत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात शामिल होण्यास सज्ज आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विन दिल्ली कॅपिटल्सशी जुडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष रहाणेवर लागून आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या माहितीनुसार राजस्थानने रहाणेच्या बदली पत्रावर स्वाक्षरी केली असून त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाकडे पाठवण्यात आले. यानंतर राजस्थान फ्रँचायझीनेही या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि बीसीसीआय (BCCI) यांना त्यांची संमती पाठविली आहे. गुरुवारी, आयपीएलची ट्रेड विंडो बंद होईल आणि त्यानंतर फ्रँचायझींमध्ये कोणत्याही खेळाडूची अदला-बदल होऊ शकणार नाही. रहाणेची किंमत 4 कोटी आहे. रहाणेच्या बदल्यात रॉयल्सला दिल्ली कॅपिटलचे दोन खेळाडू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. (IPL 2020: मुंबई इंडियन्स संघात शामिल झाला ट्रेंट बोल्ट, राजस्थान रॉयल्सने अंकित राजपूतला पंजाबसह केले ट्रेड)

रहाणेला शामिल करण्यासाठी आणि त्याच्या फलंदाजीला अजून मजबूत करण्यासाठी दिल्ली काही महिन्यांपासून रॉयल्सशी चर्चा करीत होती. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे गेल्या हंगामात दिल्लीचे सल्लागार होते आणि रहाणेसारखा अनुभवी खेळाडूने त्याच्या संघात असावा अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान, या महिन्याच्या 8 तारखेला, दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या पुढच्या आवृत्तीत ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याच्या संघात शामिल होण्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. अश्विन शेवटच्या दोन सत्रात पंजाबकडून खेळत होता आणि त्या संघाचा कर्णधारही होता.

दिल्ली कॅपिटल संघातील खेळाडूंकडे नजर टाकली तर त्यांच्याकडे श्रेयस अय्यर, रिषभ पंत, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, अंकुश बैन्स, मनजोत कालरा यांसारखे युवा खेळाडू आहेत. याच्याशिवाय शिखर धवन, इशांत शर्मा आणि अमित मिश्रा सारखे अनुभवी टीम इंडियाचे खेळाडूही आहेत. परंतु दिल्ली व्यवस्थापनाची अशी इच्छा होती की भारताय संघातील दोन ज्येष्ठ खेळाडू त्यांच्याकडे असावेत ज्यांच्या कर्णधार आणि खेळाच्या अनुभवाचा फायदा त्यांना होईल. अश्विन आणि रहाणे यामध्ये फिट बसतात.