
IPL 2019: इंडियन प्रिमिअर लीग (IPL) सुरु होण्यापूर्वी महेंद्र सिंग धोनी (M S Dhoni) ह्याचा संघ चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी चेन्नई संघाला विजय मिळवून देण्यात मुख्य भुमिका असलेला खेळाडू आणि दक्षिण अफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज लुंगी नगिडी (Lungi Ngidi) ह्याची प्रकृती ठीक नसल्याने त्याला संघातून बाहेर पडावे लागले आहे. तर नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या एकदिवशी सामन्यात नगिडी संघाचा भाग होता. परंतु प्रकृती ठीक नसल्याने त्याला 4 आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नगिडी हा चेन्नईच्या संघामधून यंदा आयपीएलसाठी खेळू शकणार नाही आहे.
दक्षिण अफ्रिका संघाचे मॅनेजर मोहम्मद मूसाजी यांनी याबद्दल माहिती देत असे सांगितले की, श्रीलंका संघाविरुद्ध सामना खेळताना नगिडी ह्याला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्याला गोलंदाजी मध्येच थांबवावी लागली होती. त्यानंतर त्याची वैद्यकिय चाचणी केल्यानंतर त्याची प्रकृती ठीक नसल्याने त्याला सामना न खेळण्यासाठी सांगितले आहे.(हेही वाचा-IPL 2019 मधील पहिल्या सामन्याच्या कमाईतून 'चेन्नई सुपर किंग्स' करणार पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत)
तत्पूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघात नगिडी ह्याला 2018 मध्ये सहभागी करुन घेतले होते. त्यावेळी नगिडी ह्याने 7 सामन्यामध्ये 11 विकेट्स घेतल्या होत्या. तर यंदाच्या आयपीएलमध्ये नगिडी नसल्याने चेन्नई संघाची गोलंदाजी थोडी कमजोर दिसून येण्याची शक्यता आहे. परंतु संघात दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, मोहित शर्मा आणि केएम आसीफ सारखे भारतीय गोलंदाज संघात दिसून येणार आहेत.