IPL 2019: मुंबई, चेन्नई, दिल्ली संघांसह सनरायजर्स हैद्राबाद संघाने पटकावले Playoffs मध्ये स्थान
Representational Image |(Photo Credit-Facebook)

IPL 2019: आज (5 मे) रंगलेल्या आयपीएलच्या (IPL) शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने कोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघावर 9 गडी राखून विजय मिळवत प्ले ऑफ्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान पक्के केले. चेन्नई आणि दिल्ली संघ यापूर्वीच प्ले ऑफमध्ये पोहचले होते.

IPL ट्विट:

कोलकता नाईट रायडर्सच्या पराभवामुळे सनरायजर्स हैद्राबाद संघाला प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मिळाली. हैद्राबाद आणि कोलकता या दोन्ही संघाकडे 12 पॉईंट्स आहेत. परंतु, हैद्राबाद संघाचा नेट रनरेट अधिक असल्याने त्यांना प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी मिळाली आहे.

प्ले ऑफमध्ये खेळणाऱ्या सामन्यांमध्ये पहिल्या दोन क्रमांकांच्या संघांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी दोन वेळा संधी मिळणार आहे. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना फायनलमध्ये जाण्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे गरजेचे आहे.

प्ले ऑफ मध्ये पोहचलेल्या संघांची क्रमवारी:

1) मुंबई इंडियन्स

2) चेन्नई सुपर किंग्स

3) दिल्ली कॅपिटल्स

4) सनरायजर्स हैद्राबाद

प्ले ऑफ मधील सामने 7 मे, 8 मे आणि 10 मे रोजी होणार आहेत. तर आयपीएल 2019 चा अंतिम सामना रविवार 12 मे रोजी रंगणार आहे.