पाकिस्तानविरुद्ध ODI मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू दुखापतीने ‘बाहेर’, पण IPL 2022 साठी खेळण्यासाठी भारताकडे रवाना
मिचेल मार्श (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियाचा (Australia) स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श (Mitchell Marsh) याला पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय सामन्यांमधून वगळण्यात आले आहे आणि तो हिप फ्लेक्सरच्या दुखापतीतून रिकव्हरी सुरू होत असताना आयपीएल 2022 साठी दिल्ली कॅपिटल्स  (Delhi Capitals) संघात सामील होईल. आयपीएल (IPL) लिलावात तब्बल 6.5 कोटी रुपयांत विकत घेतलेला मार्श 6 एप्रिलला पाकिस्तानमधील व्हाईट-बॉल मालिका संपल्यानंतर दिल्ली कॅपिटल्समध्ये सहभागी होणार होता. दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावात केवळ सात परदेशी खेळाडू विकत घेतले आणि उपलब्धतेच्या अडचणींमुळे व इतर प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे मुंबईविरुद्ध फक्त दोन खेळाडूंना मैदानात उतरवले होते. मार्श आणि डेविड वॉर्नर मूळत: 6 एप्रिलनंतर कॅपिटल्समध्ये सामील होणार होते. (IPL 2022, MI vs DC: मुंबई इंडियन्ससाठी पहिले पाढे पंचावन्न; चुरशीच्या सामन्यात दिल्ली 4 विकेटने विजयी, रोहितच्या ‘पलटन’ला 10 वा ओपनिंग झटका)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले की, मार्श या दौऱ्यातील उरलेल्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याच्या मूल्यांकनानंतर त्याला रिलीज करण्यात येईल. “मार्श दिल्ली कॅपिटल्स संघाशी जोडण्यासाठी भारतात जाईल जेथे माजी ऑस्ट्रेलियन आणि सध्याचे न्यू साउथ वेल्स फिजिओथेरपिस्ट पॅट फरहार्ट अलगाव कालावधीनंतर त्याची पुनर्प्राप्ती व्यवस्थापित करतील,” क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवेदनात म्हटले आहे. दरम्यान पाकिस्तान दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांनी 1-0 ने पराभूत केल्यावर ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेनंतर एक टी-20 सामना खेळून दौऱ्याची सांगता करणार आहे. “प्रवास आणि अलगाव ब्रेकशिवाय माझ्या पुनर्प्राप्तीवर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम असणे हा सर्वोत्तम मार्ग आहे,” मार्श म्हणाला. एनरिच नॉर्टजे याच्यानंतर मार्श हा दुसरा कॅपिटल्सचा खेळाडू असेल जो त्याचे पुनर्वसन सुरू ठेवेल.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला अनेक दुखापतींच्या समस्यांचा सामना करावा लागला असून टीम फिजिओ ब्रेंडन विल्सन यांची कोविड-19 सकारात्मक चाचणीचा देखील संघाला फटका बसला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की पाकिस्तानमधील सर्व उपलब्ध खेळाडू आणि कर्मचारी मंगळवारच्या सामन्यानंतर व बुधवारी त्यांची पुन्हा नकारात्मक चाचणी आली आहे. 5 एप्रिलला एकमेव टी-20 सामना खेळवला जाणार आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला मंगळवारपासून सुरुवात झाली असून पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.