Ind Vs WI Test: भारताने 1 डाव आणि 272 धावांनी केली वेस्ट इंडिजवर मात
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी(Photo Credits: Twitter)

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामान्यांमध्ये भारताने विजयी सलामी दिली आहे. पहिला सामना भारताने १ डाव आणि २७२ धावांनी जिंकत आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिज १९६ धावांमध्ये पॅव्हेलियन मध्ये परत गेला. १२ ऑक्टोबर पासून हैदराबाद मध्ये दुसरी कसोटी सुरु होईल.

टॉस जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने वेस्ट इंडिंजसमोर 649 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं मात्र पहिल्या डावात वेस्ट इंडिंजचा संघ १८१ धावांवर ऑलआऊट झाला. त्यानंतर भारताने फॉलोऑन ची संधी दिली होती. मात्र दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिंज चमकदार कामगिरी करू शकली नाही.

 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यानच्या सामन्यात पृथ्वी शॉ चं दमदार पदार्पण झालं. त्याने पदार्पणातच पाहिलं शतक झळकावलं. विराट कोहलीनेही त्याच्या करियर मधील २४ शतक या टेस्ट मॅच च्या दुसऱ्या दिवशी झळकावलं आहे.