भारतीय निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी (England Tour) भारतीय कसोटी संघ आणि मायदेशात दक्षिण आफ्रिके (South Africa Series) विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी केएल राहुलची (KL Rahul) भारतीय संघाच्या (Indian Team) कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, तर शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) दुर्लक्ष करण्यात आले आहे. याशिवाय टी-20 मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी सारख्या खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे. दिनेश कार्तिकचे (Dinesh Karthik) टी-20 संघात पुनरागमन झाले आहे, तर उमरान मलिक, अर्षदिप सिंह ही भारतीय टी-20 संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. (IND vs SA Series 2022: क्रिकेटप्रेमींना दिलासा! दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेसाठी ‘इतक्या’ प्रेक्षकांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश)
9 जूनपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मालिकेत राहुल नेतृत्व करेल. सलामीवीर 10 महिन्यांहून अधिक काळानंतर टी-20 संघात पुनरागमन करत आहे. दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात अनेक नवीन चेहरे सामील झाले आहेत, ज्यात उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांना प्रथमच संधी मिळाली आहे. तसेच गुजरात टायटन्ससह इंडियन प्रीमियर लीग 2022 मधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अष्टपैलू हार्दिक पंड्याने गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकानंतर प्रथमच भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
🚨 JUST IN: India have announced their squads for the T20I series against South Africa and the fifth Test against England.
Details 👇 https://t.co/ozDdX5zpSN
— ICC (@ICC) May 22, 2022
भारताचा टी-20 संघ: केएल राहुल (कर्णधार), रुरुताज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.